Join us

ऐकलं का, ढिंचॅक पूजा म्हणाली ‘या’ गायकापासून मिळाली गाण्याची प्रेरणा; वाचाल तर हैराण व्हाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 18:25 IST

संगीत जगताचा आयकॉन मायकल जॅक्सन आता या जगात नाही. परंतु जर तो  हयात असता अन् भारतातील त्याच्या ‘या’ चाहतीला ...

संगीत जगताचा आयकॉन मायकल जॅक्सन आता या जगात नाही. परंतु जर तो  हयात असता अन् भारतातील त्याच्या ‘या’ चाहतीला भेटला असता तर त्याने नक्कीच संगीत क्षेत्रातून संन्यास घेण्याची घोषणा केली असती. होय, मायकल जॅक्सनची ही चाहती छोटी-मोठी आसामी नाही, तर गायन क्षेत्रात आपल्या विचित्र गायनाने धूम उडवून देणारी आहे. आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत, याचा कदाचित तुम्हाला अंदाज आला असेल. होय, तुम्ही बरोबर ओळखले या आसामीचे नाव आहे, ढिंचॅक पूजा!दिल्लीच्या या मुलीने सध्या मोठमोठ्या रॅपर्स आणि गायकांना आपल्या आवाजाने मात दिली आहे. तिचा आवाज ऐकणाºयाला जरी असह्य होत असला तरी, तिने याच बेसूर आवाजाने लाखोंच्या संख्येने आपले चाहते निर्माण केले आहेत. वास्तविक हल्ली लोकांना काय आवडेल याचा काही नेम नसल्याने पूजाने ही संधी साधून यु-ट्यूबवर धूम उडवून दिली आहे. जस्टिन बीबर, कान्ये वेस्ट, सेलेना गोमेज, लेडी गागा आणि रिहाना यांसारख्या इंटरनॅशनल गायकांशी स्वत:ची तुलना करणारी ढिंचॅक पूजा स्वत:ला मायकल जॅक्सनची भक्त समजते. तिच्या मते, मायकल जॅक्सनकडूनच तिला गाण्याची प्रेरणा मिळाली आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला हसू आवरणे अवघड होईल, परंतु तिने हे वक्तव्य केले आहे. ढिंचॅक पूजाने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत, अशा काही बाता मारल्यात की मुलाखत घेणाराही दंग राहिला. कारण या संपूर्ण मुलाखतीदरम्यान पूजाने भारतीय गायकांचा साधा उल्लेखही केला नाही. तिच्या मुखी केवळ आंतरराष्टÑीय गायकांच्याच नावांची यादी होती. या गायकाचे नाव घेताना ती अशा काही आविर्भावात बोलायची की, जणूकाही तिने संगीत क्षेत्रात या सर्व दिग्गज मंडळींना धोबीपछाड दिली आहे. अखेरीस तर तिने हद्दच केली. मायकल जॅक्सन याच्याकडून मला गाण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगत तिने भल्याभल्यांची बोलती बंद केली. कदाचित आज मायकल जॅक्सन जिवंत असता तर त्याची यावर काय प्रतिक्रिया असती याचा विचार करणेही दुरापास्तच म्हणावे लागेल.