Join us  

सलमान खानला करायचे होते जुही चावलाशी लग्न, अभिनेत्रीच्या वडिलांनी धुडकावून लावला होता प्रस्ताव

By गीतांजली | Published: November 13, 2020 7:30 PM

जुहीच्या हास्यावर तर सगळेच फिदा होते.

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आज आपला 53वा वाढदिवस साजरा करते आहे. जुहीच्या अभिनयासोबतच त्याकाळात तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. तिच्या हास्यावर तर सगळेच फिदा होते.जुहीने आपल्या चुलबुल्या अंदाजात चाहत्यांसह  सलमान खानच्या मनातदेखील आपलं स्थान निर्माण केलं होते. एकवेळी अशी होती जेव्हा सलमानला जुहीसोबत लग्न करायचे होते मात्र जुहीच्या वडिलांनी सलमनाच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. या गोष्टीचा खुलासा सलमान खानने स्वत: एका मुलाखती दरम्यान केला होता.    

हो व्हिडीओ 28 वर्षे जुना आहे. यात स्वत: सलमान या गोष्टीचा खुलासा करताना दिसतोय. या मुलाखतीत सलमान जुहीची खूप सारी प्रशंसा करत असताना आपल्याला दिसत आहे. सलमान या मुलाखतीत सांगत आहे की, ती खूप चांगली आणि गोंडस मुलगी आहे. मी जुहीसोबत लग्न करू शकतो का असे मी तिच्या वडिलांना देखील विचारले होते. पण त्यांनी यासाठी नकार दिला.

जुही आणि सलमान कधीच नायक-नायिका म्हणून कोणत्या चित्रपटात झळकले नाहीत. जुहीने करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात 2014 मध्ये सांगितले होते की, मी अनेक समांरभात त्याच्याकडे पाहाते पण तो मला पाहून अक्षरशः पळ काढतो असे मला वाटते. कधी कधी तर मला पाहून मला तो ओळखतच नाही अशाप्रकारे वागतो.

1995 मध्ये जुहीने प्रसिद्ध व्यवसायिक जय मेहतासोबत लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत.तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. 

टॅग्स :जुही चावला सलमान खान