Join us  

मलायकाने गळ्यात घातले अर्जुनच्या अद्याक्षराचे पेंडंट?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 6:19 PM

अर्जुन आणि मलायका यांच्यालग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आता मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले आहे. या पेंडंटवर एएम असे लिहिलेले असल्याने हे पेंडेंट सध्या सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्दे या पेंडंटमधील एम हे मलायकाच्या नावातील आद्याक्षर असून ए हे अर्जुनच्या नावाचे आद्याक्षर असल्याचे म्हटले जात आहे.अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुनसोबतचे रिलेशन उघडपणे स्वीकारले आहेत. आधी दोघेही कॅमेऱ्यांपासून लपूनछपून वावरत. पण गेल्या एक दोन महिन्यांत दोघेही जगाची पर्वा न करता एकत्र दिसत आहेत.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मी सिंगल नाही, असे खुद्द अर्जुन कपूरने नुकतेच जाहीर केले आहे. तूर्तास दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. हे कपल लवरकच लग्न करणार असेही मानले जात आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आता मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले आहे. या पेंडंटवर एएम असे लिहिलेले असल्याने हे पेंडेंट सध्या सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. या पेंडंटमधील एम हे मलायकाच्या नावातील आद्याक्षर असून ए हे अर्जुनच्या नावाचे आद्याक्षर असल्याचे म्हटले जात आहे. 

अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुनसोबतचे रिलेशन उघडपणे स्वीकारले आहेत. आधी दोघेही कॅमेऱ्यांपासून लपूनछपून वावरत. पण गेल्या एक दोन महिन्यांत दोघेही जगाची पर्वा न करता एकत्र दिसत आहेत. अलीकडे ‘कॉफी विथ करण 6’ या चॅट शोमध्ये बोलताना अर्जुनने अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिलेत. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला. यावर मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला. अर्जुनच्या या खुलाशाने त्याची बहीण जान्हवी कपूर हिलादेखील आश्चयार्चा धक्का बसला. तुझ्या पार्टनरला तुझ्या कुटुंबियासोबत कधी भेटवणार, असे करणने विचारल्यावर, माझ्या कुटुंबासमोर आता मी कबूल केलेच,असे त्याने सांगितले. त्यावर मला आत्ता इथे ही गोष्ट कळली असे जान्हवी म्हणाली होती.

आपण लवकरच लग्न करणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेतही अर्जुनने यावेळी दिलेत. लग्नासाठी आता तू तयार आहेस का,असे करणने विचारले असता पूर्वी मी लग्न या गोष्टीसाठी तयार नव्हतो. पण आता मी लग्न करायला तयार आहे, असे तो म्हणाला. एवढेच नव्हे तर मलायका आणि अर्जुनने आपल्या स्वप्नांचे घरही खरेदी केले आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, मलायका-अर्जुनने मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. लग्नानंतर मलायका आणि अर्जुन या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतील, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा