Join us  

इरफान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, व्हिडिओ कॉलवरून घेतले आईचे अंत्यदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 12:00 PM

इरफान खानने लॉकडाउनमुळे व्हिडिओ कॉलवर घेतले आईचे अंत्यदर्शन

कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे कुठेही जाता येत नाही आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटणेदेखील कठीण झालं आहे. अशात अभिनेता इरफान खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे जयपूरमध्ये निधन झाले आहे. अशा परिस्थितीत त्याला आईचे शेवटचे दर्शन देखील घेता आले नाही. त्यामुळे व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेतले.

अभिनेता इरफान खानची आई सईदा बेगम यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी इरफान खानच्या आईने अखेरचा श्वास घेतला.

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे इरफान आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे त्याने आपल्या आईचे शेवटचे दर्शन हे व्हिडिओ कॉलद्वारे घेतले.

दिग्दर्शक शूजित सरकार इरफानच्या खूप जवळचे मित्र आहेत. त्यांनी सांगितले की,  इरफान खानची आई अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास जयपुरच्या आपल्या घरी घेतला. 

इरफान खान अनेक दिवसांपासून आजारी आहे. २०१७ मध्ये जूनपासून इरफान उपचार घेण्याकरता परदेशात गेला होता. इरफान खानला कॅन्सर झाल्याचे त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांना सांगितले होते. 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातून त्याने कमबॅक केले होते.

टॅग्स :इरफान खानकोरोना वायरस बातम्या