'परमाणु' चित्रपटातला डायना पेंटीचा हा अंदाज तुम्ही पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:24 IST
कॉकटेलमध्ये एका सरळ साध्या मुलगी मीराचा भूमिका साकारणारा डायना पेंटी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'हैपी भाग जाएगी' ...
'परमाणु' चित्रपटातला डायना पेंटीचा हा अंदाज तुम्ही पाहाच!
कॉकटेलमध्ये एका सरळ साध्या मुलगी मीराचा भूमिका साकारणारा डायना पेंटी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'हैपी भाग जाएगी' या चित्रपटात डायना शेवटची दिसली होती. डायनाच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे डायना एका डॉशिंग लूकमध्ये मोठ्या पडद्यावर परतते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटाची चर्चा आहे. यात डायना एका मिल्ट्री ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा आगामी चित्रपट 'परमाणु-द स्टोरी ऑफ पोखरण'मध्ये ती एक सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारते आहे या भूमिकेबाबत ती फारच उत्सुक आहे. डायनाने ट्विटरवर आपला चित्रपटातील पहिला लूक रिलीज केला आहे. ज्यात ती सैन्याच्या कपड्यात दिसते आहे. या फोटो खाली तिने एक कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. परमाणुच्या पहिल्या लूकला रिलीज करताना मी खूप उत्साहित आहेत. याचित्रपटात तिच्यासह जॉन अब्राहमसुद्धा दिसणार आहे. जॉनच्या यातला लुक गेल्या महिन्यात रिलीज करण्यात आला होता. जॉनच्या जे ए एंटरटेनमेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येते आहे. आधी याचित्रपटाचे नाव शांतिवन ठेवण्यात आले होते त्यानंतर मात्र ते बदलून 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' फायनल करण्यात आले. परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण चित्रपटाची कथा राजस्थानच्या पोखरणमध्ये झालेल्या परमाणु परीक्षणावर आधारित आहे. चित्रपटाची बरीचशी शूटिंग दिल्ली, जैसलमेर आणि पोखरणमध्ये झाली आहे. अभिषेक शर्मा याचित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. अभिषेक तेरे बिन लादेन डेड और अलाइव या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यात बोमन इराणीची महत्त्वाची भूमिका आहे. 8 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.