Join us  

चाहतीच्या मानेवर जान्हवी कपूरच्या नावाचा टॅटू! पाहून चाट पडली ‘धडक गर्ल’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 12:40 PM

अलीकडे तर एका चाहतीने असे काही केले की, जान्हवी चाट पडली. होय, जान्हवी जिमबाहेर निघाली आणि तिला तिची एक चाहती भेटली.

ठळक मुद्देजान्हवीने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या ती ईशान खट्टरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसली. या चित्रपटातील जान्हवीच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले आणि पाठोपाठ तिला चित्रपटही मिळाले.

जान्हवी कपूरचा आत्तापर्यंत केवळ एक चित्रपट रिलीज झालाय. पण या पहिल्याच चित्रपटाने जान्हवीला ‘स्टार’बनवले आहे. जान्हवीचे फॅन फॉलोर्इंग दिवसागणिक वाढते आहे. अलीकडे तर एका चाहतीने असे काही केले की, जान्हवी चाट पडली. होय, जान्हवी जिमबाहेर निघाली आणि तिला तिची एक चाहती भेटली. या क्रेजी चाहतीने आपल्या मानेवरचा जान्हवी नावाचा टॅटूही दाखवला आणि हे इतके प्रेम पाहून जान्हवी चांगलीच भारावली. मग काय, या इतक्या मोठ्या चाहतीला नाराज न करता जान्हवीने तिच्यासोबत जोरदार पोज दिलेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.यावेळी जान्हवी तिच्या जिम आऊटफिटमध्ये दिसतेय. स्काय ब्ल्यू कलरचा ऑफ शोल्डर टॉप आणि सोबत मॅचिंग शॉर्ट्समध्ये जान्हवी कमालीची सुंदर दिसतेय.

जान्हवीने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या ती ईशान खट्टरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसली. या चित्रपटातील जान्हवीच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले आणि पाठोपाठ तिला चित्रपटही मिळाले. येत्या काळात जान्हवी धर्मा प्रॉडक्शनच्याच ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटात दिसणार आहे.

हा सिनेमा औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारीत असणार आहे. २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. हा चित्रपट संपण्याआधीच जान्हवीच्या तिस-या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. होय, सूत्राच्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आपल्या तिस-या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात ती आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

टॅग्स :जान्हवी कपूर