Join us

​दीपिका-रणवीर पून्हा नव्या चित्रपटात एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 19:00 IST

बाजीराव मस्तानीच्या भरघोस यशानंतर दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग ही जोडी पून्हा एका नव्या चित्रपटात पाहावयास मिळणार आहे. संजय ...

बाजीराव मस्तानीच्या भरघोस यशानंतर दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग ही जोडी पून्हा एका नव्या चित्रपटात पाहावयास मिळणार आहे. संजय लीला भन्सालीच्या पदमावती सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार असून या चित्रपटाबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.दिग्दर्शकांनी मात्र याबाबत अजून काहीही जाहीर केलेलं नाही. पण संगीतकार श्रेयस पुराणिक यांने ट्विटरवर म्हटलं आहे की, दीपिका ही पदमावती सिनेमाचा एक मोठा भाग असणार आहे. प्रियंका की दीपिका या दोघांबाबत भन्साली हे खूप कन्फ्यूसड होते. पण आता त्यांनी दीपिकाला कन्फर्म केलं आहे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे देखील या सिनेमामध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. अंकिता लोखंडेसाठी ही खूप मोठी संधी आहे. दीपिका असल्यामुळे आता अंकिताला लीड रोल तर मिळणार नाही पण मग दोघांना काय रोल मिळतो हे देखील सिनेचाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा असेल.