Join us

दीपिका पादुकोण म्हणतेय, हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडणार नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 15:21 IST

देसी गर्ल प्रियंका चोपडानंतर हॉलिवूडमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिची हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडण्याची अजिबात मानसिकता ...

देसी गर्ल प्रियंका चोपडानंतर हॉलिवूडमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिची हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडण्याची अजिबात मानसिकता नाही. याच वर्षात ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये दमदार एंट्री करणाºया दीपिकाच्या मते हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडण्याचा मी विचारही करीत नाही. याबाबत दीपिकाने सांगितले की, बॉलिवूडमध्ये काम केल्याने माझ्यात जो बदल झाला तो अनमोल असून, न विसरण्यासारखा आहे. आज मी जे काही आहे, ते बॉलिवूडमुळेच आहे. शिवाय मला मिळालेली ओळखही बॉलिवूडचीच आहे. मी हॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय याकरिता घेतला होता, जेणेकरून मला विभिन्न परिस्थितीत विभिन्न लोकांशी काम करण्याचा अनुभव मिळावा. पुढे बोलताना दीपिकाने म्हटले की, मला असे वाटते की, चंदेरी दुनियेत वावरणारे लोक नेहमीच स्वत:चे अनुभव शेअर करीत असतात. माझ्यासाठी हॉलिवूडचा अनुभव अविस्मरणीय असून, तो मी इतरांशी शेअर करू शकते. दीपिकाला सीएनबीसी टीव्ही १८ इंडिया बिजनेस लीडर अवॉडर््स सोहळ्यात ‘एंटरटेन्मेंट लीडर आॅफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी तिने तिचे अनुभव शेअर केले. यावेळी दीपिकाला विन डिझल आणि सुपरस्टार शाहरूख खान या दोघांपैकी कोणाची निवड करणार, असेही विचारण्यात आले होते, तेव्हा तिने दोघांनाही पसंती दिली. यावेळी दीपिकाने सांगितले की, आजही माझा पॉकिटमनी तथा माझ्या आर्थिक गरजांचा माझे वडील प्रकाश पादुकोण हेच विचार करीत असतात. त्यामुळे मी याबाबत फारशी चिंता करीत नसून, माझ्या कामावर अधिक लक्ष देत असते. सध्या दीपिका संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंग आणि शाहिद कपूर हे दोघे दिसणार आहेत.