Join us  

दीपिका पादुकोण पडली आजारी, चित्रपटाची शूटिंग झाली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 8:15 AM

विशाल भारव्दाज यांच्या सपना दीदी या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि इरफान खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाची शूटिंग ...

विशाल भारव्दाज यांच्या सपना दीदी या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि इरफान खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाची शूटिंग कलाकारांची तब्येत ठिक नसल्यामुळे थांबवण्यात आली आहे. इरफान खान आणि दीपिका पादुकोण दोघांची तब्येत ठिक नाही आहे. इरफान खानच्या आजारपणाबाबत अजून काही नीट कळले नसतानाच दीपिका पादुकोणचे आजारपण सुद्धा समोर आले. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या मानेवर एक पॅच दिसला होता. त्यात आधी चर्चा होता की रणबीरच्या नावाचा टॅटू तिने काढला असल्याचा चर्चा होती. सूत्रांच्या माहितीनुसार मानेच्या दुखण्यामुळे ती सध्या फिजियोथेरेपिस्ट मदत घेते आहे. दीपिकाला मानेचा आणि पाठिचे दुखणे पद्मावतच्या शूटिंगपासून सुरु झाले आहे. पिंकवलाच्या रिपोर्टनुसार दीपिका सतत डॉक्टरांच्या संपर्कात आहे. मेडिकलच्या आधारे तिच्यात 'विटामिन डी3' ची कमतरता आहे. त्यामुळे यासाठी ती औषधे घेते आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून इरफान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याला एका  गंभीर आजाराने ग्रासले आहे.  हि माहिती स्वत: इरफान खानने त्याच्या सोशल अकाऊंटवर दिली होती. ALSO READ :  ना इटली, ना पॅरिस; मुंबईतच होणार दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न!!सपना दीदी या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती. रहीमाने आपल्या नवऱ्याच्या खूनचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॉन आखला होता. मात्र यात तिचाच मृत्यू झाला. चित्रपटात रहिमाची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. तर  मिळालेल्या माहितीनुसार इरफान त्याच्या या आगामी चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे. दीपिका पादुकोणचा आगामी चित्रपट 'सपना दीदी'मध्ये अभिनेता इरफान खान कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत दिसणार आहे. इरफानने याआधी अनेकवेळा डॉनच्या भूमिका केल्या आहेत पण पहिल्यांदाच तो मोठ्या पडद्यानर दाऊदची भूमिका करतो आहे.