Join us

दीपिका पादुकोणच्या डान्सवर सुशांत सिंग राजपूत झाला फिदा; गर्लफ्रेण्ड क्रिती सॅननने दिली अशी प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 22:32 IST

काही दिवसांपासून एक बातमी समोर येत होती, ती म्हणजे दिनेश विजन यांच्या आगामी ‘राब्ता’ या चित्रपटात दीपिका पादुकोण स्पेशल डान्स नंबर करणार आहे. आता

काही दिवसांपासून एक बातमी समोर येत होती, ती म्हणजे दिनेश विजन यांच्या आगामी ‘राब्ता’ या चित्रपटात दीपिका पादुकोण स्पेशल डान्स नंबर करणार आहे. आता दीपिकाने नुकतेच या चित्रपटातील एक खास गाणे शूट केले असून, गाण्यातील दीपिकाचा डान्स बघून चित्रपटातील मुख्य अभिनेता सुशांत सिंग राजपूत अक्षरश: दीपिकावर लटू झाला आहे; मात्र ही बाब क्रिती सॅनन हिला फारशी आवडली नसावी, कारण ती सुशांतच्या लक्ष विचलित करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करताना बघावयास मिळत आहे. त्याचे झाले असे की, सुशांतने त्याच्या सोशल अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये क्रिती आणि तो लॅपटॉपवर दीपिकाचा डान्स नंबर बघत आहेत. मध्येच क्रिती दीपिकाच्या डान्स स्टाइलविषयी सुशांतशी बोलत आहे. मात्र सुशांत क्रितीच्या प्रश्नाचे उत्तर न देता, दीपिकाच्या डान्सवर असा काही फिदा होतो की, त्याला तिच्याशी काय बोलावे हे जणू काही सुचतच नाही. तो सारखा तिचे सौंदर्य निरखून बघण्यात मग्न असतो. जेव्हा ही बाब क्रितीच्या लक्षात येते तेव्हा ती लगेचच त्याच्या डोळ्यावर हात ठेवत दीपिकाचा डान्स बघण्यास त्याला विरोध करते. सुशांतने दीपिकाचा डान्स बघू नये यासाठी क्रिती वाट्टेल ते व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.  वास्तविक चित्रपटात दीपिकाचा डान्स नंबर असेल हे सुरुवातीपासूनच निश्चित होते. निर्माता होमी अडजानिया यांनी ट्रेलर लॉन्चप्रसंगी सांगितले होते की, दीपिका त्याच्यासाठी खूपच लकी आहे. त्यामुळेच ती ‘राब्ता’मध्ये परफॉर्मन्स करणार आहे. जेव्हा होमीला दीपिकाच्या गाण्याविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, मी फक्त दीपिकाला विचारले होते की, तू माझ्या चित्रपटात एक स्पेशल नंबर करणार आहेस काय? तिने लगेचच यास होकार दिला होता. त्यानंतर आम्ही हे गाणे बुडापेस्ट येथे गाणे शूट करण्याचे नियोजन केले. सुशांत आणि क्रितीच्या या चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले. ट्रेलरमध्ये सुशांत अन् क्रितीची आॅन स्क्रीन केमिस्ट्री चांगलीच जमली असून, प्रेक्षकांनाही ती भावत आहे. दरम्यान दोघांनीही चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर त्यांच्यातील अफेयरच्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत. सुशांत तर चित्रपटाशी संबंधित दररोज काही तरी रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर करीत असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढत असताना दिसत आहे.