Join us  

​‘रईस’ची गँग सक्सेस पार्टीत पाळणार ‘ड्राय डे’!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 10:15 AM

‘रईस’ने किंगखान शाहरूख खानला आणखी ‘रईस’ केले. आता याचे ‘जश्न’ तर व्हायलाच हवे. हे ‘जश्न’ होणार पण या पार्टीत ...

‘रईस’ने किंगखान शाहरूख खानला आणखी ‘रईस’ केले. आता याचे ‘जश्न’ तर व्हायलाच हवे. हे ‘जश्न’ होणार पण या पार्टीत ‘जाम’ नसणार. ऐकता ते अगदी खरे आहे. शाहरूखच्या ‘रईस’ची बॉक्सआॅफिसवरची वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे. रिलीजनंतरच्या चार दिवसांत चित्रपटाने ७५ कोटी रूपयांचा बिझनेस केलाय. या चित्रपटात शाहरूखने एका मद्यतस्कराची भूमिका साकारली आहे. या संपूर्ण चित्रपटात शाहरूख खान ‘कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बडा कोई धर्म नहीं होता,’ हीच लाईन फॉलो करताना दिसतोय. एकंदर काय तर ‘रईस’ लोकांना चांगलाच भावला आहे. ‘रईस’ची टीम ३० जानेवारीला म्हणजे, पहिल्या वीकेंडनंतर याचे सेलिब्रेशन करणार आहे. ३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे ‘रईस’च्या टीमने मद्याशिवाय पार्टी करण्याचे ठरवले आहे. तसेचही ३० जानेवारीला ‘ड्राय डे’ असतो. त्यामुळे ‘रईस’ची टीम या दिवसाचा पूर्ण सन्मान राखताना दिसणार आहे.‘रईस’चे निर्माता रितेश सिधवानी यांनी एक निवेदन जारी करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  समीक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ‘रईस’ टीम प्रचंड आनंदी आहे. हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आले, असे वाटतेय. त्यामुळे ‘रईस’च्या संपूर्ण टीमने हा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉक्सआॅफिसवर मिळालेला प्रतिसाद सकारात्मक आहे. तीन दिवसांत चित्रपटाने ६० कोटी रूपयांचा गल्ला जमवलाय.ALSO READ : Read Hertfelt Message for SRK : ​‘काबील’ हृतिक रोशनने ‘रईस’ शाहरूख खानला मानले गुरु!So Sad SRK!! : ‘रईस’ शाहरूख खान रेल्वेनी आला पण एकाचा नाहक जीव गेला...!!‘रईस’ हा सिनेमा गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणा-या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे.(अर्थात ‘रईस’च्या मेकर्सनी याचा इन्कार केला आहे.) अब्दुल लतीफ हा दाऊदच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे, मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला, या भोवती सिनेमाचे कथानक आहे. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.