Join us

शामक दावर पुणेकरांना शिकवणार नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 12:40 IST

पुणे हे विद्येचे आणि कलेचे माहेरघर आहे. विविध ठिकाणांहून तरुणाई इथे शिक्षणासाठी येत असते. मुंबईप्रमाणेच पुणेही आता डिजिटल हब ...

पुणे हे विद्येचे आणि कलेचे माहेरघर आहे. विविध ठिकाणांहून तरुणाई इथे शिक्षणासाठी येत असते. मुंबईप्रमाणेच पुणेही आता डिजिटल हब होत असल्याने याच डिजिटलायजेशनच्या मदतीने नवनवीन व्हिडिओ पाहून आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून पुणेकरांना पारंपरिक कलेसोबत वेस्टर्न कल्चरमध्येही रस असल्याचा दिसून येतो. सध्या तरुणांची पसंती असते ती वेगवेगळे डान्स फॉर्म्स शिकण्याला. आपणही सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं केलंच पाहिजे हा अट्टहास प्रत्येकाच्या मनात असतो आणि नेमकं त्याचप्रमाणे ते प्रयत्नशील देखील असतात.पुण्यामध्ये भारतभरातून आणि भारताबाहेरून मुले शिकण्यासाठी येतात. शिवाय आयटी क्षेत्र येथे झपाट्याने वाढत असल्याने तरुणांची संख्या मोठ्या प्रकारे आहे. शिक्षणाशिवाय आपल्याला वेगवेगळ्या कला शिकता याव्यात यासाठी विविध वर्कशॉप आणि संस्थांशी ही मुले जोडली जातात. पुण्यात खास करून पारंपरिक नृत्याची शिकवण देणाऱ्या संस्था आणि वर्कशॉप खूप प्रमाणात दिसतात. पण क्लासिकल नृत्यासोबतच वेस्टर्न डान्स स्टाईल मध्येही पुण्यात सध्या कुतुहुलता वाढत चालली आहे. म्हणूनच प्रत्येकाला सगळ्यात हटके डान्स स्टाईल शिकायला मिळावी याच्या शोधात हे डान्सवेडे असतात. अशाच  डान्सवेड्या तरुणाईसाठी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर खास पुणेकरांसाठी "डान्सथॉन" घेऊन येत आहेत. बॉलिवूड मध्ये शामक दावर हे नाव मोठ्या मानाने घेतले जाते. शामकने आजवर दिल तो पागल है, ताल, किस्ना, बंटी और बबली, धूम २, तारे जमीन पर, युवराज, रब ने बना दी जोडी, जग्गा जासूस यांसारख्या चित्रपटांतील गाणी कोरिओग्राफ केली आहेत. शामक आणि त्यांच्या टीमकडून पुणेकरांसाठी प्रत्यक्षात डान्सचे धडे दिले जाणार आहेत, यापेक्षा कमालीची गोष्ट असू शकणार नाही. पारंपरिक नृत्यशैलीच्या पलीकडे जाऊन काहीतरी भन्नाट डान्स स्टाईल या एक दिवसीय कार्यशाळेत शिकवले जाणार असून यात थिएटर बॉलिवूड, स्वॅग, जॅझ अशा हटके डान्स स्टाईल शिकायला मिळणार आहेत. दोन वेगवेगळ्या टोकाच्या डान्स स्टाईल एकत्रपणे शिकण्याचा हा अनोखा अनुभव येत्या २५ तारखेला सिम्बायोसिस कॉलेज मध्ये लोकांना घेता येणार आहे. तर पुणेकरांनो तयार व्हा हटके डान्स स्टाईल शिकण्यासाठी! Also Read : स्टार स्क्रीन अवॉर्ड्स पुरस्कार सोहळ्यात शामक दावरने या चित्रपटासाठी पटकावला पुरस्कार