चिमुकला अबराम खान करतोय ‘डॅडी कूल’ची ‘कॉपी’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 10:16 IST
शाहरूख खानचा लाडका अबराम खान एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. शाहरूखइतकेच त्याचेही चाहते आहेत. मुलाचे पाय पाळण्यातच दिसू लागतात, अशी ...
चिमुकला अबराम खान करतोय ‘डॅडी कूल’ची ‘कॉपी’!!
शाहरूख खानचा लाडका अबराम खान एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. शाहरूखइतकेच त्याचेही चाहते आहेत. मुलाचे पाय पाळण्यातच दिसू लागतात, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. अबरामबद्दलही ही म्हण खरी ठरणार असे वाटतेय. तुमचा विश्वास बसत नाहीयं? तर मग डॅडी ‘किंंगखान’सोबतचे अबरामचे काही क्यूट फोटो तुम्ही पाहायलाच हवेत. या फोटोतील एका गोष्टीकडे तुमचे लक्ष जाणार नाही. पण फोटो काळजीपूर्वक बघा. शाहरूख व अबराम या बाप-लेकात काही कॉमन दिसतं? आम्हाला दिसलेय. ही कॉमन गोष्ट म्हणजे, शाहरूख व अबराम खान या दोघांचा फॅशन सेन्स. अबरामने आपल्या डॅडीचा केवळ देखणेपणाच उचललेला नाही तर डॅडीचा फॅशन सेन्सही घेतला आहे. या फोटोत तरी तसेच दिसतेय. जे शाहरूखने कॅरी केलेय, चिमुकल्या अबरामच्या कपड्यांमध्येही डॅडीच्या याच फॅशन सेन्सचे प्रतिबिंब दिसतेय. पहिल्यांदा हा योगायोग असावा, असेच आम्हाला वाटले. पण प्रत्येकवेळी योगायोग कसा असणार? शाहरूख व अबरामचे अनेक इव्हेंटमधले फोटो पाहिल्यावर तर आम्हाला खात्रीच झाली. ती म्हणजे, शाहरूखचा अबरामवर जबरदस्त प्रभाव जाणवतोय. अनेक फोटोंमध्ये शाहरूख व अबराम यांचा ड्रेसिंग सेन्स अगदी सारखा आहे. ALSO READ : ऐका शाहरुख खानचा मुलगा अबरामचा गोड आवाज!शाहरुखने अबरामला मीडियापासून कधीच दूर ठेवलेले नाही. वडिलांसोबत हा ज्युनियर सुपरस्टार सेटवर, विदेशात सुट्यांसाठी जात असतो. शाहरुखही त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. शाहरूखची दोन्ही मुल आर्यन आणि सुहाना आता मोठे झाले आहेत. त्यामुळे सध्या चिमुकल्या अबरामचे लाड सुरू आहेत.एका आंतरराष्ट्रीय संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, अबराम हा नव्या पीढीचा सुपरस्टार असल्याचे शाहरूख म्हणाला होता.