Join us

परिणितीला नाही पडत ‘ट्रोलिंग’मुळे फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 12:05 IST

सोशल मीडियावर कधी कोणाची टिंगल टवाळी केली जाईल याचा काही नेम नाही. सोनम कपूर, आलिया भट, अनुष्का शर्मा या ...

सोशल मीडियावर कधी कोणाची टिंगल टवाळी केली जाईल याचा काही नेम नाही. सोनम कपूर, आलिया भट, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींना याचा चांगलाच अनुभव आहे. मध्यंतरी ‘इशकजादे’ स्टार परिणिती चोप्रालादेखील सोशल मीडिया ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.तिने मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तिने मैत्रिणीला ‘कमी खा आणि बारीक हो’ असा संदेश दिला होता. यावरून तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. ‘परिणिती तु मैत्रिणीला लठ्ठ म्हणून हिणवले आहेस’ अशा आशयाचे ट्विटस्, जोक्स इंटरनेटवर व्हायरल झाले होते.यावर तिचे उत्तर होते की, अशा ट्रोलिंगमुळे मला काही फरक पडत नाही. जे लोक असे बोलतात ते माझ्या ओळखीचे किंवा मी त्यांच्याकडे लक्ष द्यावे असे नाहीत. सो...नो प्रॉब्लेम!