Join us

Confirm 'या' कॅम्पसह आलियाच्या पदार्पणचा मुहूर्त ठरला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 17:01 IST

अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्टुडंट ऑफ द इयर सिनेमातून बॉलीवुडमध्ये एंट्री मारली. करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात आलियाच्या अभिनयाने ...

अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्टुडंट ऑफ द इयर सिनेमातून बॉलीवुडमध्ये एंट्री मारली. करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात आलियाच्या अभिनयाने सा-यांवर जादू केली. त्यानंतर हायवे, टू स्टेट्स, हम्टी शर्मा की दुल्हनियाँ, शानदार, उडता पंजाब, कपूर एंड सन्स, ऐ दिल है मुश्किल आणि नुकताच रिलीज झालेल्या डिअर जिंदगी या सिनेमात आलियाने आपल्या अभिनयाने छाप पाडली. बॉलीवुडमध्ये सुपरहिट आणि दर्जेदार सिनेमा देणारे अशी ओळख असणा-या भट्ट कॅम्पमधील सदस्य आणि महेश भट्ट यांची कन्या असूनही आलिया भट्टने त्यांच्या कोणत्याही सिनेमात काम केलेले नाही. आजवर भट्ट कॅम्प वगळता बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह काम केले आहे. मात्र आता आलिया आणि आलियाच्या फॅन्सची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच भट्ट कॅम्पच्या सिनेमात आलिया झळकणार आहे. रियल लाइफमध्ये गायक बनलेल्या आलिया आता भट्ट कॅम्पच्या या नव्या सिनेमातून रुपेरी पडद्यावरही गायिका बनणार आहे. भट्ट कॅम्पच्या आगामी 'आशिकी-3' या सिनेमात आलिया गायिकेची भूमिका साकारणार आहे. आलियाचा चुलत भाऊ मोहित सुरी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून आलियाची बहिण शाहिन भट्ट हिने या सिनेमाची पटकथा लिहली आहे. भट्ट कॅम्पच्या आशिकी सिरीजचा हा सिनेमा तिसरा भाग असेल. आलियासह तिचा नायक असणार आहे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा. रियल लाइफमध्ये आलिया आणि सिद्धार्थच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या दोन्ही लव्हबर्ड्सची केमिस्ट्री या सिनेमातून रसिकांना पाहायला मिळणार आहे. आशिकी-2मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरने गायिकेची भूमिका साकारली होती. आता श्रद्धाप्रमाणेच गायिकेच्या भूमिकेत आलिया पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून आशिकी-3मध्ये हृतिक रोशन आणि सोनम कपूर झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. आता मात्र आलिया आणि सिद्धार्थ आशिकी-3मध्ये काम करणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर झाल्याने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र आशिकी-3 या सिनेमाच्या निमित्ताने भट्ट कॅम्पच्या सिनेमात आलिया भट्टचे पदार्पण होत आहे.