को-स्टारने दारू पिऊन असे काही केले की, 'या' अॅक्ट्रेसला झाल्या प्रचंड वेदना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 17:44 IST
सेलिब्रिटींचे लाइफ जेवढे हायफाय असते तेवढेच आव्हानात्मकही असते. कारण कधी, कुठे कुठली घटना घडेल याचा अंदाज बांधणे अवघड असते. ...
को-स्टारने दारू पिऊन असे काही केले की, 'या' अॅक्ट्रेसला झाल्या प्रचंड वेदना!
सेलिब्रिटींचे लाइफ जेवढे हायफाय असते तेवढेच आव्हानात्मकही असते. कारण कधी, कुठे कुठली घटना घडेल याचा अंदाज बांधणे अवघड असते. आता हेच बघा ना अभिनेत्री काजल अग्रवाल हिने नुकताच शूटिंगदरम्यान एक अनुभव सांगितला अन् सगळेच आश्चर्यचकित झाले. दारूच्या नशेत तिच्या को-स्टारने केलेल्या कारनाम्यामुळे तिला प्रचंड वेदनेचा सामना करावा लागल्याचे तिने सांगितले. काजलने सांगितले की, गेल्या वर्षी जून महिन्यात साउथच्या एका चित्रपटाच्या फायनल शेड्यूलच्या गाण्याचे शूटिंग सुरू होते. मात्र याच दरम्यान तिच्या को-स्टारने तिच्या कमेरेवर जोरात चिमटा घेतला. त्यामुळे तिला प्रचंड वेदना झाल्या. तिने लगेचच शूटिंग थांबविण्यास सांगितले. जेव्हा असिस्टंट डायरेक्टने संबंधित घटनेबाबत माहिती घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, संबंधित को-स्टार हा दारूच्या नशेत होता. त्यांनी लगेचच त्याला शूटिंग स्थळावरून बाहेर काढले. वास्तविक त्या को-स्टारला काजलच्या कमरेवर हात ठेवून डान्स करायचा होता. परंतु त्याने हात न ठेवताच तिच्या कमरेला दाबत जोरदार चिमटा काढला. त्यामुळे काजलला प्रचंड वेदना झाल्या होत्या. जेव्हा संपूर्ण परिस्थिती निवळली तेव्हा काजलने रिटेक घेत पुन्हा गाण्याच्या सेम सीनला सुरुवात केली. परंतु हा अनुभव तिच्यासाठी खूपच वेदनादायी असा होता. एका आॅफिशियल अॅप लॉन्चिंगप्रसंगी तिने हा अनुभव सांगितला. काजलसोबत असा प्रसंग पहिल्यांदाच झाला असे नाही, तर ‘दो लफ्जों की कहाणी’ या चित्रपटादरम्यान तिचा को-स्टार रणदीप हुड्डा यानेही किसिंग सीन देताना असाच काहीसा प्रताप केला होता. रणदीपला स्क्रिप्ट व्यतिरिक्तच हा सीन करायचा होता. त्याने काजलला काही कळण्याच्या आतच किस करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काजल चांगलीच गोंधळून गेली होती. तिने कोणाशीही न बोलता सेटवर काढता पाय घेतला. त्यानंतर दिग्दर्शक दीपक तिजोरी यांच्याशी चर्चा करून हा सीन डिलीट करण्याचे सांगितले होते. त्याचबरोबर काजल २०१५ मध्ये ‘पुली’ येथील आॅडिओ फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी चेन्नई येथे गेली होती. यावेळी तिच्या एका चाहत्याने तिच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. हे जेव्हा काजलच्या लक्षात आले तेव्हा ती चांगलीच गोंधळून गेली होती. या घटनेचा एक व्हिडीओ मीडियामध्येदेखील आला होता. ज्यात काजल तिच्या फॅन्सच्या घोळक्यात दिसत होती.