Join us

​‘कृति’चा वाद : शिरीष कुंदरने ठोकला पाच कोटींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 20:10 IST

दिग्दर्शक शिरीष कुंदर याचा वादग्रस्त लघूपट ‘कृति’ पुन्हा आॅनलाईन उपलब्ध आहे. आता ‘कृति’चे दिग्दर्शक शिरीष कुंदर याने आपल्या नुकसान ...

दिग्दर्शक शिरीष कुंदर याचा वादग्रस्त लघूपट ‘कृति’ पुन्हा आॅनलाईन उपलब्ध आहे. आता ‘कृति’चे दिग्दर्शक शिरीष कुंदर याने आपल्या नुकसान भरपाईसाठी अनिल नेऊपाने याच्यावर पाच कोटी रूपयांचा दावा दाखल केला आहे. नेपाळी फिल्ममेकर अनिल नेऊपाने याने ‘कृति’संदर्भात कॉपीराईटचा दावा केला होता. यानंतर ‘कृति’ यू ट्यूबवरून हटविण्यात आला होता. आता या प्रकरणाच्या १७ दिवसांनंतर ‘कृति’ पुन्हा एकदा यू ट्यूबवर उपलब्ध आहे. २२ जूनला ‘कृति’ रिलीज झाला होता. मात्र ‘कृति’ हा लघूपट आपली फिल्म ‘बॉब’ची जशीच्या तशी कॉपी असल्याचा आरोप अनिल नेऊपाने याने केला होता होता. मात्र शिरीष याने हा दावा खोडून काढत, सत्याचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. यासंदर्भात शिरीषने सांगितले की,  मी ‘कृति’ची स्क्रिप्ट मुंबईच्या फिल्म राइटर्स असोसिएशन तसेच राइटर्स गिल्ड आॅफ अमेरिका येथे ३ वर्षांपूर्वी रजिस्टर केली होती. त्यामुळेच मला भीती नव्हतीच. दुसºया पार्टीने आमच्याकडून २५ लाख रूपयांची नुकसानभरपाई मागितली होती. पण मी पुरावे सादर करण्यासाठी १४ दिवसांचा वेळ मागून घेतला होता. एखाद्याने कॉपीराईटचा दावा केल्यास यू ट्यूब संबंधित सामग्री हटवते. मात्र यानंतर दावा करण्यास त्याचा दावा सिद्ध करण्यासाठी १४ दिवसांचा वेळ दिला जातो. अनिल नेऊपाने या १४ दिवसांचा आपला दावा सिद्ध करू शकला नाही. या संपूर्ण प्रकरणात माझी मानहानी झालीय शिवाय आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणूनच मी अनिलविरूद्ध पाच कोटींचा दावा ठोकला आहे.