Join us

चंकी पांडेने गायले लेकीचे गोडवे; म्हटले, ‘धर्मासाठीच अनन्याचा झाला जन्म’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 16:15 IST

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ‘स्टूडेंट आॅफ द इयर-२’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. मुलीच्या बॉलिवूड पदार्पणामुळे ...

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ‘स्टूडेंट आॅफ द इयर-२’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. मुलीच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चंकी पांडे चांगलाच आनंदी दिसत आहे. त्याच्या आनंदाचे कारण म्हणजे अनन्या करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत बनविल्या जात असलेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. टीओआयनुसार, चंकीने सांगितले की, ‘मला असे वाटत आहे माझी मुलगी स्टार बनली आहे.’ एका रिपोर्टनुसार, चंकीने सांगितले की, ‘मी खूपच नर्व्हस आहे. अनन्या एक ब्रिलियंट स्टूडेंट आहे. तिने पुढील शिक्षणासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलेस (यूसीएलए) आणि यूयॉर्कच्या विद्यापीठामध्ये अप्लाय केले आहे. तिने निर्धार केला की, केवळ एकाच वर्षात ती यातील एका विद्यापीठात प्रवेश मिळविणार. चंकीने सांगितले की, ‘काय करायचे याविषयी अनन्याचा माइंड खूपच क्लियर आहे. तिला चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची इच्छा आहे. जेव्हा ती दहावी उत्तीर्ण झाली होती तेव्हापासूनच तिला या प्रोफेशनमध्ये यायचे होते. तेव्हापासून ती अभिनयाचे धडेही घेत आहे. मात्र त्याचबरोबर अनन्या एक चांगली विद्यार्थिनीदेखील आहे. अभिनयासाठी तिने शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. रिपोर्ट्सनुसार, चंकी म्हणतो की, ‘करण जोहरसोबत काम करण्याची संधी दुसरी असूच शकत नाही. वृत्तानुसार, चंकीने हेदेखील म्हटले की, ‘अनन्याचा जन्मच धर्मा प्रॉडक्शनसाठी झाला आहे. दरम्यान, ‘स्टूडेंट आॅफ द इयर-२’मध्ये अनन्यासह अभिनेता टायगर श्रॉफ आणि तारा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, संपूर्ण टीम त्यामध्ये व्यस्त आहे.