Join us  

'गुड न्यूज' चित्रपट बनविताना दिग्दर्शक राज मेहता यांच्यासमोर होते हे चॅलेंज

By तेजल गावडे | Published: December 27, 2019 6:00 AM

अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट गुड न्यूजमधून राज मेहता यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.

अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट गुड न्यूजमधून राज मेहता यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा?'गुड न्यूज' चित्रपटाच्या आधी सात -आठ चित्रपटांचे असोशिएट डिरेक्टर म्हणून काम पाहिलं आहे. तसेच काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शनही केलं आहे. धर्मा प्रोडक्शन्सच्या तीन चित्रपटांसाठी काम केलं आहे. शशांक खेतानसोबत 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियां' व 'बद्रीनाथ की दुल्हनिया' चित्रपटासाठी असोशिएट डिरेक्टर म्हणून काम केलं. शकून बत्राच्या कपूर अ‍ॅण्ड सन्स चित्रपटाचे असोशिएट डिरेक्टर म्हणून काम पाहिलं. त्यामुळे शशांक खेतान, शकून बत्रा व करण जोहर यांच्यासोबत इंटरअ‍ॅक्शन होत असतं. जेव्हा गुड न्यूजची कथा माझ्याकडे आली तेव्हा करण जोहर यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांचा मी आभारी आहे.

'गुड न्यूज' चित्रपटात आयव्हीएफसारखा मुद्दा विनोदी अंदाजात का सादर केला?'गुड न्यूज' चित्रपटाची स्क्रीप्ट लेखिका ज्योती कपूर माझ्याकडे घेऊन आल्या होत्या. आयव्हीएफ ट्रीटमेंटचा अनुभव त्यांनी घेतला होता. त्यामुळे त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिली होती. मला हा कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग वाटला. मग, त्या स्क्रीप्टमध्ये बदल करून त्याला थोडं कॉमिक आणि व्यावसायिक चित्रपटाचं स्वरूप देण्यात आलं. अक्षय कुमार यांच्यासोबत बसून स्क्रीप्टवर चर्चा करून थोडाफार बदल केला. ह्युमरस पद्धतीने प्रेग्नेंसीदरम्यान येणाऱ्या समस्या दाखवताना महिलांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली. विशेष म्हणजे आमच्यासमोर हेच मोठे चॅलेंज होते. या चित्रपटातून आयव्हीएफबद्दल लोकांना माहिती मिळणार आहे. तसेच लोकांना याबाबत असलेले गैरसमजदेखील दूर होईल. 

चित्रपटाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये करण जोहरचा किती सहभाग होता?करण जोहर यांचा शूटिंगला सुरूवात होण्यापूर्वीच्या सेटअपमध्ये सहभाग होता. एकदा शूटिंगला सुरूवात झाली की ते अजिबात लुडबूड करत नाहीत. ते दिग्दर्शकाला काम करण्याची पूर्ण मुभा देतात. सेटवर ते एकदा ते दोनदा आले होते. त्यावेळी ते सेटवरील सगळ्यांची विचारपूस करण्यासाठी आले होते.  चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा अनुभव कसा होता?खूप छान अनुभव होता. शूटिंग कसं संपलं हे कळलंदेखील नाही. माझे दिग्दर्शन असलेला माझा हा पहिला चित्रपट होता. त्यामुळे मी थोडा नर्व्हस होतो. इतके मोठे कलाकार आहेत, तर त्यांच्यासोबत काम करताना सुरूवातीला खूप दडपण होते. पण सेटवर अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ व कियारा हे कलाकार सेटवर खूप शांत असायचे. पहिल्या दिवशी शूटिंगवेळी मी सुरूवातीचा थोडा वेळ नर्व्हस होतो. पण, कलाकारांच्या कम्फर्टेबल वागणुकीमुळे माझ्या मनावरील दडपण निघून गेले. मी स्वतःला नशीबवान समजतो की मला इतके चांगले कलाकार मिळाले. 

टॅग्स :गुड न्यूज