काळा पैसा, नकली नोटा आणि भ्रष्टाचार या भारतीय अर्थव्यवस्थेला पोखरणाऱ्या तीन गोष्टींचे उच्चाटन करण्याचा उपाय म्हणून ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा क्रांतिकारी आणि धाडसी निर्णय काल नरेंद्र मोदी सरकारने घेतला. देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशावेळी ‘बी-टाऊन’चे कलाकार कसे बरे मागे राहतील? त्यामुळेच काल मध्यरात्रीपासून या सर्वांनी ‘टिवटिवाट’ सुरू केलाय..जाणून घेऊयात काळा पैसाविरोधातील या निर्णयावर सेलिब्रिटींची काय मतं आहेत ते...
अर्जुन कपूर :सामाजिक मुद्यांवर अर्जुन कपूर सातत्याने ट्विटरवरून त्याचे मत मांडत असतो. ५०० व १००० च्या नोटांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाचे त्याने स्वागत केले आहे. तो म्हणतो,‘देशात एकसूत्रीपणा आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मोदींनी उचलले आहे. पैशांचा योग्य वापराचे भविष्यातील फायदे आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील.’
अनुष्का शर्मा :सोशल मीडियावर स्वत:ची परखड मते मांडणारी अनुष्का शर्मा हिनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. ट्विटरवर ती म्हणते,‘देशाच्या एकात्मतेसाठी मोदींनी उचललेले हे पाऊल अतिशय धाडसी आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी त्यांच्या या निर्णयाला पाठींबा द्यायला हवा.’
सुनील शेट्टी :बॉलिवूडचे सर्व कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव झाले असताना सुनील शेट्टी मागे कसा राहील? त्यानेही मोदींच्या निर्णयाचे आनंदाने स्वागत केलेय.‘११ नोव्हेंबर जेव्हाही येतो तेव्हा काही ना काही धमाका होतो. काळ्या पैशांविरोधात आत्तापर्यंत घेण्यात आलेला हा सर्वांत ‘बोल्ड अॅण्ड ब्रेव्ह’ निर्णय म्हणावा लागेल, असे ट्विट त्याने केलेयं.
मधुर भांडारकर :‘चांदणी बार’,‘कॉर्पाेरेट’अशा उत्तम कथानकांवर आधारित चित्रपटांचा प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर याने मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.‘नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन. ५०० व १००० च्या नोटांना चलनातून बाद करण्याचा निर्णय अतिशय आक्रमक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी मोदींचे हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल, असे ट्विट त्याने केलेय.
अभिषेक कपूर :‘बी टाऊन’च्या बोटावर मोजता येण्याइतक्या दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणजे अभिषेक कपूर. ‘उडता पंजाब’,‘आॅल इज वेल’,‘फितूर’ यासारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले. सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा अभिषेक कपूर म्हणतो,‘मोदी प्लेड‘ट्रम्प्ड’कार्ड, पूरी इंडिया ‘हिलरी’ हैं.’
विवेक ओबेरॉय :बॉलिवूडमधून आता जवळपास गायबच झालेला विवेक ओबेरॉय नोटांच्या मुद्यावर टिवटरवर चांगलाच अॅक्टिव्ह झाला. तो म्हणतो,‘अमेरिका मते मोजतीयेतर भारत नोटा मोजतेय.‘भ्रष्टाचारविरोधात मोदींचा मास्टरस्ट्रोक..’