Join us  

थोडक्यात वाचले राज कुंद्रा, वाहनांना धडक देणार-या गाडीचा मालक शिल्पा शेट्टीचा पती, पण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 4:59 PM

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. शिल्पा शेट्टीसह राज कुंद्रा देखील व्हिडीओच्या माध्यमातून मजा मस्ती करताना दिसतात.

बंगळुरुमध्ये एका ऑडी चालकाने ऑटोरिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली होती. पोलिसांनी आता या कारची ओळख पटवली असून ही कार शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या नावावर असल्याचे रिपोर्ट्समध्ये पोलिस सुत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे. मात्र कुंद्रा यांनी 2 महिन्यांपूर्वीच ही कार विकली होती.पोलिसांनी सांगितले की, "आम्हाला मुंबईतील आरटीओ अधिका-यांकडून माहिती मिळाली की कारचा मालक शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आहे. मात्र ही कार दोन महिन्यांपूर्वी ही बंगळूरमधील एका व्यापा-यावा विकण्यात आली आहे. कार विकल्यानंतरही कारची कागदपत्रे अजुनही राज कुंद्राच्याच नावावर होते. 

मोहम्मद साहब अशी कार डिलरची ओळख पटली आहे.मोहम्मद यांनी पोलिसांना सांगितले की, "मला खूप भीती वाटली होती. म्हणून मी घटनास्थळी थांबलो नाही. अपघातात झालेल्या वाहनाचे नुकसान भरून काढण्यास मी तयार आहे."

घटना रविवारी दुपारी 2.45 वाजता घडली. MH-02-BP-0010 क्रमांकाची ऑडी R8 ने  सेंट मार्क्स रोडजवळील हॉटेलजवळ ऑटोरिक्षा आणि दोन मोटारसायकल्सना धडक दिली. कोणालाही काही समजण्याआधीच गाडी गायब झाली होती. वाहन चालक आणि मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी झाले आहेत, परंतु वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कब्बन पार्क वाहतूक पोलिस स्टेशनमध्ये हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. शिल्पा शेट्टीसह राज कुंद्रा देखील व्हिडीओच्या माध्यमातून मजा मस्ती करताना दिसतात. दोघांमध्यही खूप चांगली केमिस्ट्री असल्यामुळे सोशल मीडियावरही दोघेही लोकप्रिय आहेत.मेजशीर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. रसिकांकडून वाहवा मिळवत असतात. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा वियानचा जन्म २०१२ साली झाला आहे. मागील वर्षी शिल्पा सरोगसीच्या मदतीने एका मुलीची आई झाली आहे. या मुलीचे नाव समीशा ठेवले आहे.

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी