ब्रेक-अप वगैरे सगळेचे खोटे...! अंबानीच्या पार्टीत हातात हात घालून दिसले रणवीर- दीपिका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 18:26 IST
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या ब्रेकअपची बातमी मध्यंतरी धडकली आणि दोघांच्याही चाहत्यांच्या मनात धस्स झाले. रणवीर दीपिकाला लग्नाची ...
ब्रेक-अप वगैरे सगळेचे खोटे...! अंबानीच्या पार्टीत हातात हात घालून दिसले रणवीर- दीपिका!!
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या ब्रेकअपची बातमी मध्यंतरी धडकली आणि दोघांच्याही चाहत्यांच्या मनात धस्स झाले. रणवीर दीपिकाला लग्नाची घाई करतोय. पण दीपिका यासाठी तयार नाही. तिला आपल्या करिअरवर फोकस करायचेय, म्हणून ती रणवीरला टाळत असल्याचीही खबर आली. यानंतर गेल्या ब-याच दिवसांत रणवीर आणि दीपिका एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे ब्रेकअपची बातमी खरी की काय, म्हणून सगळीकडे चर्चा सुरु झाली. पण थांबा...असे नाहीय. अंबानीच्या पार्टीत रणवीर व दीपिकाचे फोटो पाहून तरी तसे वाटत नाही. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची पुतणी इशिता हिच्या लग्नाचा बार लवकरच उडणार आहे. याच आनंदात मुकेश अंबानी यांनी एक जंगी पार्टी दिली. या पार्टीला ऐश्वर्या राय, शाहरूख खान, आमिर खान यांच्यासह दीपिका व रणवीरही पोहोचले. पण कसे? तर हातात हात घेऊन...होय. रणवीर व दीपिका परस्परांपासून विभक्त झालेत अशी बातमी चर्चेत असताना दोघांचेही असे हातात हात घालून अंबानीच्या पार्टीत दिसणे सगळ्यांनाच सुखद धक्का देऊन गेले. रणवीर व दीपिका यांच्या ब्रेकअपमागे रणवीरची त्याची ‘बेफिक्रे’ को-स्टार वाणी कपूर हिच्यासोबत वाढती सलगी हेही एक कारण सांगितले गेले. पण अंबानीच्या पार्टीत मुळात दोघांमध्येही कुठलाही दुरावा नसल्याचेच स्पष्टपणे दिसले. क्रिम रंगाच्या साडीतील दीपिका रणवीरसोबत अतिशय आनंदात असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. दोघेही परस्परांची कंपनी एन्जॉय करत असल्याचे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून स्पष्टपणे दिसत होते. दीपिकाचा हात हातात घेण्यापासून तर तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडण्यापर्यंतचे ‘जेन्टलमन’ रणवीरचे वागणे पाहून कुणीही भारावून जावे. मग दीपिका भाळली तर त्यात नवल कुठले?