बॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 20:59 IST
अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पाटनी गेल्या सोमवारी लेट नाइट स्पॉट झाले. दोघेही बांद्रा येथील एका रेस्टॉरेंटमध्ये डिनरसाठी गेले होते.
बॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ!
अभिनेता टायगर श्रॉफ गेल्या सोमवारी गर्लफ्रेंड दिशा पाटनीसोबत डिनर डेटवर जाताना बघावयास मिळाला. याबाबतचा दोघांचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये माध्यमांचे कॅमेरे बघताच दोघेही तेथून घाई गडबडीत रेस्टॉरेंटमध्ये जाताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये टायगर आणि दिशा काळ्या रंगाच्या कारमधून उतरताच थेट रेस्टॉरेंट गाठतात. बांद्रा येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये हे दोघे डिनरसाठी गेले होते. कारमधून उतरताच दिशा आपल्या मोबाइलमध्ये व्यस्त होते. ती मोबाइलमध्ये इतकी व्यस्त होते की, बॉयफ्रेंड टायगरकडे न बघताच थेट रेस्टॉरेंटमध्ये जाते. यावेळी दिशाने घातलेल्या हॉट पॅण्ट आणि क्रॉप टॉपमुळे ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. तर टायगर फॉर्मल लूकमध्ये तिच्या मागे येताना दिसून आला. वास्तविक या दोघांना कॅमेरे दिसल्यामुळेच त्यांनी तेथून लगबगीने काढता पाय घेणे योग्य समजले. दरम्यान, दिशा आणि टायगरचा काही दिवसांपूर्वीच ‘बागी-२’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून या दोघांनी पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केली होती. चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. प्रेक्षकांना दोघांची केमिस्ट्री अशी काही पसंत आली की, आठवडाभरातच चित्रपटाने शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. दरम्यान, दिशा आणि टायगर या दोघांनीही अद्यापपर्यंत त्यांच्यातील नात्याची जाहीरपणे कबुली दिली नाही. मात्र हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. ‘बागी-२’नंतर या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा चांगलीच रंगत आहे. सध्या दोघेही त्यांच्या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, दिशाने सुपरस्टार सलमान खानच्या ‘भारत’मध्ये एंट्री केली आहे.