Join us

BOX OFFICE : ‘वीरे दी वेडिंग’ने दोनच दिवसात वसूल केला निर्मितीचा खर्च, कमाविले इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 17:57 IST

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाने केवळ दोनच दिवसामध्ये बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. कारण चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या ...

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाने केवळ दोनच दिवसामध्ये बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. कारण चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापेक्षाही दुसºया दिवशी अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट आगामी काळात बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देईल असेच काहीसे चित्र आहे. दरम्यान, चित्रपटाने दुसºया दिवशी १२.२५ कोटी रुपयांची कमाई केली असून, चित्रपटाच्या निर्मितीसाठी लागलेला खर्च वसूल करण्यासाठी चित्रपट काही पावलेच दूर आहे. ‘वीरे दी वेडिंग’च्या निर्मितीसाठी सुमारे ३० कोटी इतका खर्च आला आहे. अशात दुसºयाच दिवशी चित्रपटाने मुसंडी मारल्याने निर्मितीचा खर्च जवळपास वसूल झाल्यासारखा आहे. दरम्यान, चित्रपटाने ओपनिंग डेला म्हणजेच शुक्रवारी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली. तर शनिवारी आणखी मजल मारताना १२.२५ कोटींचा गल्ला जमविला. अशात चित्रपटाने दोनच दिवसात २२.९५ कोटी रुपये कमाविले आहेत. आता असा अंदाज वर्तविला जात आहे की, रविवारच्या दिवशी चित्रपट ३५ कोटींपेक्षा अधिकचा आकडा पार करू शकतो.  दरम्यान, सुरुवातीला असा अंदाज वर्तविला जात होता की, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकणार नाही. परंतु हे सर्व अंदाज मोडीत काढत चित्रपटाने दमदार सुरुवात केली आहे. चित्रपटाची यशस्वी घोडदौड पाहता निर्माता अजूनही प्रमोशनवर भर देत आहेत. नुकतेच ‘नागिन’ या प्रसिद्ध मालिकेत चित्रपटातील चारही स्टारकास्ट प्रमोशनसाठी पोहोचली होती. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कमाई करताना, अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ आणि अजय देवगणच्या ‘रेड’ या चित्रपटाला पिछाडीवर सोडले आहे. पहिल्या दिवशी १०.७० कोटींच्या कमाई करून चित्रपटाने दोन रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. कारण ‘पॅडमॅन’ने पहिल्या दिवशी १० कोटी २६ लाख रुपयांचा बिझनेस केला होता. तर अजयच्या ‘रेड’ने १० कोटी ४ लाख रुपयांचा गल्ला जमविला होता.