Join us  

जान्हवी कपूरच्या ‘या’ सवयीने पापा बोनी कपूर चिंतीत! WhatsApp चॅट व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 12:30 PM

निर्माता बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर सध्या ब्रिटनमध्ये सुट्टीचा आनंद घेतले. पण तूर्तास जान्हवीच्या एका ‘व्यसना’ने बोनी कपूर यांना चिंतेत टाकले आहे.

ठळक मुद्देजान्हवी कपूर सतत जिममध्ये असते. आपल्या सोशल अकाऊंटवरही जान्हवी आपले फिटनेस व्हिडीओ शेअर करत असते. जान्हवी अगदी एकही दिवस जिम मिस करत नाही.

निर्माता बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर सध्या ब्रिटनमध्ये सुट्टीचा आनंद घेतले. पण तूर्तास जान्हवीच्या एका ‘व्यसना’ने बोनी कपूर यांना चिंतेत टाकले आहे. होय, जान्हवी व बोनी कपूर यांच्यातील व्हाट्स अ‍ॅप चॅटिंग व्हायरल झाले आणि याचा खुलासा झाला. खुद्द जान्हवीने तिच्या पापांचे हे व्हॉट्स अ‍ॅप चॅट शेअर केले.

या चॅटमध्ये बोनी कपूर यांनी जान्हवीला एका वृत्तपत्रातील लेखाचे कटींग पाठवलेले दिसतेय. या लेखात अतिव्यायाम केल्याने काय नुकसान होते, ते सांगितले गेले आहे. गरजेपेक्षा अधिक व्यायाम तुमच्या शरिरीला घातक ठरू शकतो, हे या लेखात लिहिले आहे. पापाने या लेखाचे कटींग जाणीवपूर्वक जान्हवीला पाठवले आहे. यावर रिप्लाय देत जान्हवीने पापाला एक इमोजी सेंड केला आहे. यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच. याचा अर्थ एकच, जान्हवी कपूर सतत जिममध्ये असते. आपल्या सोशल अकाऊंटवरही जान्हवी आपले फिटनेस व्हिडीओ शेअर करत असते. जान्हवी अगदी एकही दिवस जिम मिस करत नाही. पण नेमक्या तिच्या याच व्यसनामुळे बोनी कपूर चिंतेत आहेत. याच चिंतेपोटी त्यांनी अतिव्यायामाचे दुष्परिणाम सांगणारा लेख जान्हवीला सेंड केला. आता या लेखानंतर जान्हवीत किती सुधार होतो ते बघूच...

जान्हवीने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या ती ईशान खट्टरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसली. या चित्रपटातील जान्हवीच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले आणि पाठोपाठ तिला चित्रपटही मिळाले. येत्या काळात जान्हवी धर्मा प्रॉडक्शनच्याच ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटात दिसणार आहे.२०२०मध्ये प्रदर्शित होणाºया या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. हा चित्रपट संपण्याआधीच जान्हवीच्या तिस-या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. होय, सूत्राच्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आपल्या तिस-या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात ती आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

टॅग्स :जान्हवी कपूरबोनी कपूर