बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतचे ड्रिम होम आतून असे दिसते, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिच्या मनाली येथील घराची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगनाच्या या ड्रीम हाउसचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी केवळ बाहेरून या घराचा नजारा दिसत होता. आता कंगनाने तिच्या घराचे एक फोटोशूट केले असून, कंगना राणौत डेली नावाच्या ट्विटर अकाउंटवरून ते शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगनाच्या ड्रिम हाउसचा जबरदस्त नजारा बघावयास मिळतो. हे फोटो बघून खरोखरच कंगनाचे घर ड्रिम असल्याची प्रचिती झाल्याशिवाय राहात नाही.
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतचे ड्रिम होम आतून असे दिसते, पाहा फोटो!
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिच्या मनाली येथील घराची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगनाच्या या ड्रीम हाउसचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी केवळ बाहेरून या घराचा नजारा दिसत होता. आता कंगनाने तिच्या घराचे एक फोटोशूट केले असून, कंगना राणौत डेली नावाच्या ट्विटर अकाउंटवरून ते शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगनाच्या ड्रिम हाउसचा जबरदस्त नजारा बघावयास मिळतो. हे फोटो बघून खरोखरच कंगनाचे घर ड्रिम असल्याची प्रचिती झाल्याशिवाय राहात नाही. कंगनाने मनाली येथील सिमसा येथे घर बांधले आहे. कंगनाने हे काटकोनी शैलीने घर बनविले आहे. बाहेरून घर बघितल्यानंतर असे वाटते की, हे विदेशी शैलीत बनविले गेले असावे. हे घर बांधताना कंगनाच्या आवडी-निवडी जपल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ३० कोटी रुपयांमध्ये बांधलेल्या या घराला आर्किटेक्चरल डायजेस्ट मॅगझिनच्या जून २०१८ च्या एडिशनमध्ये स्थान देण्यात आले आहे. हिमालयाच्या सुंदर आणि निसर्गरम्य स्थळी बांधलेल्या या सुंदर घराच्या प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. फोटो बघून हे स्पष्ट होते की, याच्या इंटेरियरसाठी कंगना आणि तिच्या टीमने किती मेहनत घेतली असावी. कंगनाच्या या घरात त्या सर्व सोयीसुविधा आहेत, ज्याविषयी तुम्ही विचारही करू शकत नाही. घराला शुभम गुप्ताने डिझाइन केले आहे. कंगना आपल्या फिगरवर विशेष लक्ष देत असते. याचा विचार करून घरातच जिम बनविण्यात आली आहे. कंगनाच्या या सुंदर घराच्या छताला ग्लास बसविण्यात आले आहेत. या घरात जवळपास ८ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये मोठ्या काचेच्या खिडकीसह विंडो व्ह्यू देण्यात आला आहे. त्यामुळे कुठल्याही रूममध्ये बसून तुम्ही बाहेरील निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.