Join us  

Isha Ambani Wedding : बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी केलं असे काही काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 11:11 AM

ईशा अंबानीच्या लग्नाचा थाटा संपूर्ण जगाने पाहिला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले. 12 डिसेंबरला या भव्यदिव्य विवाहसोहळ्याचा थाट संपूर्ण जगानं अनुभवला

ठळक मुद्देआता या लग्नातील काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसतायेतबिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान पाहुण्यांना जेवण वाढताना दिसतायेत

ईशा अंबानीच्या लग्नाचा थाटा संपूर्ण जगाने पाहिला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले. 12 डिसेंबरला या भव्यदिव्य विवाहसोहळ्याचा थाट संपूर्ण जगानं अनुभवला. हे ग्रँड लग्न अंबानींच्या मुंबईतील निवासस्थान अॅन्टीलिया येथे करण्यात आले. या सोहळ्याला मोठ-मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली. नवविवाहीत वधु-वर ईशा-आनंदचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.  ईशा अंबानीच्या लग्नाला नेते, उद्योगपती आणि बॉलीवूड जगातातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.  

या लग्नासाठी अमेरिकेहुन फर्स्ट माजी फर्स्ट लेडी हिलेरी क्लिंटन देखील आल्या होत्या. आता या लग्नातील काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसतायेत. या व्हिडीओमध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान पाहुण्यांना जेवण वाढताना दिसतायेत. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. 

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची प्री-वेडिंग सेरेमनी उदयपूरमध्ये पार पडले. त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तसेच अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी परफॉर्मन्स सादर केला. सलमान देखील एका गाण्यावर थिरकला होता. पण सलमान स्टेजवर परफॉर्मन्स सादर करत असताना मुकेश अंबानीच्या मुलाने एंट्री केली आणि सलमान मागे झाला आणि तो मागे उभा राहून डान्स करू लागला. यावरूनच सलमान तिथे बॅकराऊंड डान्सर होता असे त्याला नेटिझन्सने हिणवले होते.

टॅग्स :ईशा अंबानी आणि आनंद पिरामलआमिर खानअमिताभ बच्चनऐश्वर्या राय बच्चन