Join us  

"न्यायव्यवस्थेत सुधारणेची गरज"; आर्यनला पाठिंबा देत पूजा बेदीने डागलं न्यायव्यवस्थेवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:35 PM

Aryan khan drugs case: ड्रग्स पार्टीमध्ये आर्यनचं नाव समोर आल्यानंतर कलाविश्वातीन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.यामध्येच अभिनेत्री पूजा बेदीने (pooja bedi) आता आर्यनची पाठराखण केली आहे.

ठळक मुद्देआर्यन ऑर्थर रोड तुरुंगात असून त्याच्या जामीन याचिकेवर २० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी (cruise rave party) अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) लेक आर्यन खान (aryan khan) सध्या तुरुंगात आहे. २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB)कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला होता. या पार्टीमध्ये आर्यन सहभागी असल्याचं समोर आलं. आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुख खान कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, दोन वेळा आर्यनचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आर्यनला सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहे. येत्या २० ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. ड्रग्स पार्टीमध्ये आर्यनचं नाव समोर आल्यानंतर कलाविश्वातीन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.यामध्येच अभिनेत्री पूजा बेदीने (pooja bedi) आता आर्यनची पाठराखण केली आहे.

पूजा बेदीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आर्यनला पाठिंबा दिला आहे. तिच्या या ट्विटवरुन सोशल मीडियावर पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

cruise drugs case: पूजा भट्टने उघड केलं एनसीबीला टीप देणाऱ्या व्यक्तीचं नाव?

"आर्यनजवळ कोणतेही ड्रग्स सापडले नाहीत. मग एका निर्दोष मुलाला तुरुंगात प्रत्येक दिवस घालवावा लागतोय हे भीतीदायक नाहीये का? कोणत्याही कारणाशिवाय एखाद्याला तुरुंगात डांबणं हे मानिसक त्रास दिल्यासारखं आहे.न्यायव्यवस्थेमध्ये मोठ्या सुधारणेची गरज आहे.. अशा यंत्रणा निर्दोष व्यक्तींना शिक्षा देत गुन्हेगार निर्माण करण्यायचं काम करत आहेत", अशा आशयाचं ट्विट पूजा बेदीने केलं आहे. 

दरम्यान, पूजा बेदीचं हे ट्विट सोशल मीडियावर वाऱ्यासारखं व्हायरल झालं आहे. अनेकांनी आर्यनची बाजू घेत तिला पाठिंबा दिला आहे. तर, काहींनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. सध्या आर्यन ऑर्थर रोड तुरुंगात असून त्याच्या जामीन याचिकेवर २० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आर्यनला तुरुंगात कैदी नंबर मिळाला असून N956 हा त्याचा नंबर आहे.

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीआर्यन खानपूजा बेदीनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोअमली पदार्थ