गौरी लंकेश यांच्या हत्येने बॉलिवूडही संतापले; सेलिब्रिटींच्या संतप्त प्रतिक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 11:53 IST
सुप्रसिद्ध पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या घरातच गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होत आहे. ...
गौरी लंकेश यांच्या हत्येने बॉलिवूडही संतापले; सेलिब्रिटींच्या संतप्त प्रतिक्रिया!
सुप्रसिद्ध पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या घरातच गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होत आहे. बॉलिवूडनेही या घटनेनंतर संताप व्यक्त करत, न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. अभिनेत्री शबाना आझमी,फरहान अख्तर, शेखर कपूर, महेश भट्ट आदींनी या घटनेची निंदा केली आहे.सुप्रसिद्ध पत्रकार आणि ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या गौरी लंकेश यांचे बेंगळुरू येथील राजराजेश्वरी भागात घर आहे. येथेच घराबाहेर रात्री ८ वाजताच्या सुमारास मारेकºयांनी त्यांना जवळून गोळ्या झाडल्या. यानंतर गौरी जागीच कोसळल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. उजव्या विचारसरणीविरोधात बोलणाºया विचारवंतांची हत्या होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांचीही हत्या झाली होती. लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर #GauriLankesh असा हॅशटॅग ट्रेंड झाला. बॉलिवूडनेही सोशल मीडियावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया बोलून दाखवल्या. गौरी लंकेश या यांचा जीव घेणारे लोक कोण, असा सवाल सेलिब्रिटींनी केला आहे.# शबाना आझमी यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. गौरी लंकेश यांच्या घराबाहेर त्यांची हत्या झाली. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या मारेकºयांना तात्काळ शिक्षा व्हावी, असे tweet त्यांनी केले आहे.# सत्यासाठी लढणा-यांना जीवानिशी मारले जाते. हा कुठला न्याय आहे, असे tweet शेखर कपूर यांनी केले आहे.# या कुठल्या समाजात आपण जगतोयं? गौरी लंकेश यांच्या कुटुंबाप्रति संवेदना. तात्काळ न्यायाची अपेक्षा, असे फरहान अख्तरने लिहिलेय.# दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश. अशा एकाच विचारसरणीच्या लोकांची हत्या होत असेल तर त्यांना मारणाºयांची विचारसरणी कुठली? असा प्रश्न जावेद अख्तर यांनी उपस्थित केला आहे.# जेव्हा वादविवादाला जागा उरत नाही, तेव्हा विचारांचा गळा घोटणाºया असंतुष्टांसाठी हत्या हे एक साधन बनते, असे tweet महेश भट्ट यांनी केले आहे.