Join us  

ऐकावं ते नवलच...! बॉलिवूडची ही अभिनेत्री करते स्वतःचे न्यूड फोटो आणि MMS व्हिडिओ लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 5:30 PM

बॉलिवूडची ही अभिनेत्री बोल्डनेसमुळे असते नेहमी चर्चेत

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो व व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो व व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरल झाले आहेत. ती स्वतः सुद्धा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. मात्र काही दिवसांपूर्वी पूनमचा एक व्हिडिओ लीक झाला होता ज्यात ती तिच्या जोडीदारापेक्षा आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती. यामुळे ती सायबर क्राइमची शिकार झाली असल्याचे बोललं जात होते. या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.

पूनमचा हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता मात्र तिच्याकडून याबाबत कोणतीही सायबर क्राइमची तक्रार दाखल केली गेली नाही. त्यामुळे पूनम स्वतःचे MMS स्वतःच लीक करत असल्याचं बोललं जातं आहे. तसंही एका मुलाखतीत पूनमनं ती पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही करू शकते असं वक्तव्य केलं होतं. त्याचवेळी ती स्वतःच तिचे व्हिडिओ आणि MMS लीक करत असल्याचंही तिनं सांगितलं होतं. पूनमच्या या वक्तव्यानंतर सगळीकडेच खळबळ माजली होती.

पूनमनं हे स्टेटमेंट ‘द विकेंड’च्या प्रमोशनच्या वेळी केली होती. ती म्हणाली होती की, मी स्वतःच माझे बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शूट करून लीक करते. 

यावेळी तिने चर्चेत राहण्यासाठी सर्व करत असल्याचं मान्य केलं होतं आणि यात काही चुकीचं नाही असं सर्व अभिनेत्री करत असल्याचं तिने म्हटलं होतं. 

पूनम पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती 'द जर्नी ऑफ कर्मा'मध्ये शक्ती कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे ती चर्चेत आली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद मिळाला होता. 

टॅग्स :पूनम पांडे