Join us  

एका रात्रीत झाली सुपरस्टार, करिअर यशाच्या शिखरावर असताना केलं लग्न अन् बॉलिवूडमधून झाला होती गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 4:56 PM

साऊथ इंडस्ट्रीत ती मधुबाला या नावाने ओळखली जाते. 1990मध्ये मल्याळम सिनेमाद्वारे मधूने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि पुढे बॉलिवूड तिला खुणावू लागले.

‘फुल और कांटे’ हा सिनेमा पाहिला असेल तर या चित्रपटातील एक सुंदर चेहरा क्षणात तुमच्या डोळ्यांपुढे येईल. होय, अभिनेत्री मधू. तिची ओळख करून द्यायचीच झाली तर सुंदर चेहरा, गोड हास्य आणि सहज सुंदर अभिनय अशी करून देता येईल़. बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री मधू.  मधू गेल्या १२ वर्षांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे, मात्र आजही तिची जादू कायम आहे. 

 साऊथ इंडस्ट्रीत ती मधुबाला या नावाने ओळखली जाते. 1990मध्ये मल्याळम सिनेमाद्वारे मधूने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि पुढे बॉलिवूड तिला खुणावू लागले. मधूचे नशीब इतके जोरावर होते की, ‘फुल और कांटे’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे मधूने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अजय देवगण व मधूचा 1991मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. चित्रपटातील गाण्यांनी तर लोकांना अक्षरश: वेड लावले आणि या चित्रपटासोबत मधू एका रात्रीत स्टार झाली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1992 साली ‘रोजा’ या सिनेमातही ती झळकली. हा सिनेमाही हिट झाला.. या सिनेमातील अभिनयाने तिने सर्वांचेच मन जिंकले होते.

मधूने करिअर पीकवर असताना 1999 मध्ये बिझनेसमन आनंद शाहसोबत लग्न केले. मधू दोन सुंदर मुलींची आई आहे. अमेया आणि किया असे मधुच्या मुलीचे नाव आहे. मधूने बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं असलं तरी आजही तिचं संपूर्ण लक्ष कुटुंबावर केंद्रीत आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटी