Join us  

बॉबी देओलचा 'बरसात' सिनेमाच्या सेटवर झाला होता गंभीर अपघात, 25 वर्षानंतरही विसरणं झालं अशक्य....

By गीतांजली | Published: October 11, 2020 8:00 AM

1995 साली ‘बरसात’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये बॉबी देओलने धमाकेदार एन्ट्री केली होती.

बॉबी देओलला बॉलिवूडमध्ये काम करता करता 25 वर्षे झाली आहेत. 1995 साली ‘बरसात’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये बॉबी देओलने धमाकेदार एन्ट्री केली होती. बॉबी आपल्या कारकीर्दीची 25 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करतो आहे. पहिल्याच सिनेमा 'बरसात'च्या शूटिंग दरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे आजही त्याच्या पायात एक रॉड टाकलेली आहे.  हा अपघात त्यावेळी झाला होता जेव्हा बॉबी आपल्या पहिल्या सिनेमाचा पहिला सीनचे शूटिंग करत होता. या सीनमध्ये त्याला घोड्यावरुन एंट्री करायची होती. 

अलीकडेच बॉबी देओलने एका मुलाखतीत आपल्या पहिल्या चित्रपटाविषयी सांगितले, 'पहिल्या सीनचे शूटिंग करत असताना तो दुसर्‍या घोड्यावर आदळला आणि त्याचा पाय मोडला. दुखापतीमुळे त्याला दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, बॉबीने म्हणाला, 'माझ्या भावला सिनेमातील माझा पहिला सीन बेस्ट करायचा होता. आम्ही इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्टमध्ये होतो. माझा पहिला शॉट होता. माझी दुसऱ्या घोड्यासोबत टक्कर झाली आणि माझा पाय मोडला. माझ्या पायात आजही एक रॉड आहे. त्यानंतर दोन सर्जरी केल्यानंतर तो ठीक झाला.'

‘बरसात’ या सिनेमानंतर गुप्त, सोल्जर, अजनबी असे काही हिट सिनेमे दिलेत. बॉबी देओलने यावर्षी डिजिटल डेब्यू केला. त्याची 'क्लॉस ऑफ 83' आणि 'आश्रम' ही वेब सीरिज प्रेक्षकांनी चांगलीच गाजली आहे.

या अभिनेत्रीवर जीवापाड प्रेम करायचा बॉबी देओल, केवळ धर्मेंद्र यांच्यामुळे होऊ शकले नाही लग्न !

 

टॅग्स :बॉबी देओल