बॉबी डार्लिंग करणार रमणिक शर्माशी विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:58 IST
एकेकाळी बिग बॉसमध्ये सहभागी होऊन चर्चेचा विषय ठरलेली बॉबी डार्लिंग भोपाळचे उद्योगपती रमणिक शर्मा यांच्याशी विवाह करणार आहे. येत्या ...
बॉबी डार्लिंग करणार रमणिक शर्माशी विवाह
एकेकाळी बिग बॉसमध्ये सहभागी होऊन चर्चेचा विषय ठरलेली बॉबी डार्लिंग भोपाळचे उद्योगपती रमणिक शर्मा यांच्याशी विवाह करणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये ती 'कोर्ट मॅरेज' करणार असून, त्यानंतर भोपाळ आणि मुंबईत एक रिसेप्शन पार्टीही होणार असल्याचे समजते. बॉबीनेही या वृत्ताला दुजोरा देताना, होय मी रमणिक शर्मा यांच्याशी विवाह करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबाबत मला अधिक चर्चा करायला आवडत नसल्याचेही तिने नमूद केले आहे. बॉबीने २0१0 मध्ये लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्याचप्रमाणे २३ वर्षाची असताना तिने १८ 'गे' भूमिका केल्या होत्या. त्यामुळे 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदही झाली होती. मुनाफ नरुला आणि अंकित शर्मासोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची अफवाही होती. मात्र, आता त्या सर्व चर्चेवर पडदा पडला आहे.