Join us  

स्ट्रगलच्या दिवसात उपाशी राहून या सेलिब्रेटीने स्टेशनवर काढले होते दिवस, आज आहे टॉपचा दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 7:00 AM

मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे राहायला जागा नव्हती.

कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा आज आपला वाढदिस साजरा करतो आहे. रेमोचा जन्म 2 एप्रिल 19774 साली बंगळुरुमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. बॉलिवूडमधील इथंपर्यंतचा प्रवास रेमोसाठी सोपा नव्हता यासाठी त्याला प्रचंड स्ट्रगल करावं लागलं. 

मायकेल जॅक्सनचा फॅन असलेल्या रेमो डिसूझाचा कोणीही गुरु नाही. रेमोने डान्सचे कोणतेही  प्रशिक्षण घेतलेले नाही. रेमोला लहानपणापासूनच डान्सची आवड होती. शाळेच्या दिवसांत तो फंक्शनमध्ये भरपूर डान्स करायचा. एका मुलाखती दरम्यान रेमो डिसूझाने सांगितले की आपण चित्रपट पाहून आणि संगीत व्हिडिओंच्या मदतीने तो डान्स शिकला.

रेमो मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे राहायला जागा नव्हती. त्यावेळी एका कुटुंबाने रेमोला मदत केली. मित्रांच्या मदतीने त्यांनी मुंबईत 3 डान्स अकॅडमी सुरू केल्या. सुरुवातीला असे फक्त चार विद्यार्थी होते, जे हळूहळू वाढले. रेमोने एकदा सांगितले की, पावसाळ्यात त्याच्याकडे कोणत्याही वेळी विद्यार्थी नव्हता, मग खायला पैसे नव्हते. त्या दिवसांत तो वांद्रे स्टेशनवर उपाशी बसून राहायचा. 

ऑल इंडिया डान्स स्पर्धेत रेमोची टीम पहिली आली यानंतर तो लाईमलाईटमध्ये आला. त्याने अहमद खानबरोबर एक वर्ष सहाय्यक म्हणून काम केले. मग तो स्वतःच कामाला लागला. आता रेमो डिसूजा हे डान्स जगातलं मोठे नाव बनलं आहे. कोरिओग्राफीसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. रेमोने अनेक सिनेमांचे दिग्दर्शन देखील केले आहे. यात सलमान खानच्या  रेस 3,  स्ट्रिट डान्सर 3 D, ABCD या सिनेमांचा समावेश आहे.आज तो बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आहे. 

टॅग्स :रेमो डिसुझा