Join us

Birthday Special :​नयनतारा नावाच्या वादळाने ‘उद्धवस्त’ केले प्रभुदेवाचे आयुष्य!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 11:02 IST

‘भारताचा मायकल जॅक्सन’म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा याचा आज(3 एप्रिल) वाढदिवस. एक डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून ...

‘भारताचा मायकल जॅक्सन’म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा याचा आज(3 एप्रिल) वाढदिवस. एक डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून त्याने मोठे नाव कमवले. अभिनेता म्हणून तो ओळख निर्माण करू शकला नाही. पण आपल्या नृत्याने त्याने भारतातील कोट्यवधी नृत्यवेड्यांना जणू वेड लावले. जाणून घेऊ यात, प्रभूदेवाबद्दल काही खास गोष्टीप्रभुदेवा सुंदरम याचा जन्म ३ एप्रिल १९७३ रोजी म्हैसूरमध्ये झाला. प्रभुदेवा लहानपणापासून पित्याच्या नृत्यामुळे प्रभावित होते. त्याचे वडील साऊथ इंडियन फिल्म्समध्ये डान्स मास्टर होते. पित्याकडून प्रभुदेवा भरतनाट्यम आणि वेस्टर्न डान्स शिकला.प्रभुदेवाचे दोन्ही भाऊ राजू सुंदरम आणि नागेन्द्र प्रसाद दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. खरे तर प्रभुदेवाला अ‍ॅक्टर व्हायचे होते. प्रभुदेवाने आपले करिअर एक डान्सर आणि अभिनेता म्हणून सुरू केले. मात्र अभिनयात त्याला फार यश गाठता आले नाही. प्रभुदेवाने आपल्या करिअरची सुरुवात डान्स कोरिओग्राफर म्हणून केली होती. मात्र नंतर त्याला अभिनय खुणावू लागला. यानंतर १९९४ मध्ये ्रप्रभुदेवाने ‘इंदू’ नामक सिनेमा केला. या चित्रपटात त्याच्या अपोझिट दिसली होती ती अभिनेत्री रोजा. प्रभुदेवाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी अशा अनेक चित्रपटांत काम केले. शिवाय १०० पेक्षा अधिक चित्रपटांत नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले. नृत्यदिग्दर्शनासाठी प्रभुदेवाला दोनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. प्रभुदेवाने राम लता हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर राम लताने आपले नाव बदलून लता केले. या दोघांना तीन मुले झालीत. २००८ मध्ये यापैकी एका मुलाचा कॅन्सरने मृत्यू झाला. यानंतर २०१० मध्ये प्रभुदेवाच्या खासगी आयुष्यात नयनतारा नावाचे वादळ आले. नयनतारा ही साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात जास्त वादग्रस्त अभिनेत्री आहे. २०१० मध्ये प्रभुदेवाच्या पत्नी फॅमिली कोर्टात याचिका दाखल करत नयनतारा आणि प्रभुदेवा हे दोघे लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचा आरोप केला.  इतकेच काय तर प्रभुदेवाने नयनतारासोबत लग्न केले तर ती उपोषण करेल, अशी धमकीही दिली. त्यानंतर काही महिला संघटनांनी नयनतारा विरोधात आंदोलनही केले. पण नयनताराने मीडियात बयान देत, माझ्यात व प्रभुदेवात काहीही नाही, असे स्पष्ट केलेपण तोपर्यंत प्रभुदेवा व नयनतारा यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या होत्या. खरे तर नयनताराने २००८ पासून प्रभुदेवा व नयनतारा एकमेकांना डेटींग करत होते. पण प्रभुदेवाची पत्नी कोर्टात गेली तेव्हा नयनताराने असे काही नसल्याचे अगदी शिरजोरपणे सांगितले. एकीकडे माझ्यात व प्रभुदेवात काहीही नसल्याचे नयनतारा सांगत होती तर दुसरीकडे प्रभुदेवा नयनताराच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. नयनतारानेही प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्मही स्विकारला होता. ती आधी ख्रिश्चन होती. अखेर नयनतारासाठी प्रभुदेवाने एक मोठा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते तोडत २०११ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला. यापोटी प्रभुदेवाला   १० लाख रुपए, शिवाय २० ते २५ कोटींची प्रॉपर्टी शिवाय दोन कार असे सगळे पत्नीला द्यावे लागले. यामुळे नयनताराचे प्रेम आपल्याला मिळेल, असा प्रभुदेवाचा अंदाज होता. पण त्याचा हा अंदाज फसला. जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभुदेवाने पत्नीला सोडले त्या नयनताराने २०१२ मध्ये प्रभुदेवासोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले. तेव्हापासून प्रभुदेवा एकटा आहे. त्याच्याकडे फार कामही नाहीये. अधूनमधून तो सिनेमा दिग्दर्शित करतो. कामामध्ये त्याने स्वत:ला गुंतवून घेतले आहे. त्याचा एकाकी प्रभाव सुरु आहे.