Join us  

लग्न, प्रेम, घटस्फोट अन् मग.. अशी सुरु झाली अनुपम खेर आणि किरण खेर यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 9:12 AM

किरण खेर यांचं पहिलं लग्न गौतम बेरींसोबत झाले होते. उद्योगपती गौतमसोबतचे हे लग्न फार काळ टिकलं नाही.

बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.किरण खेर यांचा जन्म 14 जून 1955 रोजी चंदीगड, पंजाब येथे एका शीख कुटुंबात झाला. किरण खेर यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात पंजाबी फीचर फिल्म आसरा प्यार दामधून केली होती. 1983 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटानंतर किरण खेर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर ती १९९६ मध्ये श्याम बेनेगल यांच्या सरदारी बेगम या चित्रपटात त्या दिसल्या. खूबसूरत, दोस्ताना, फना, वीर-जारा, मैं हूं ना आणि देवदास यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. 

किरण खेर यांनी अनेक टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिलंय. किरण यांनी त्यांचं सुरुवातीचे शिक्षण चंदीगडमधून केले. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून इंडियन थिएटर विभागात पदवीचे शिक्षण घेतले.

पहिल्या लग्नानंतर झाला होता घटस्फोटकिरण खेर यांचं पहिलं लग्न गौतम बेरींसोबत झाले होते. उद्योगपती गौतमसोबतचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. किरण व अनुपम यांची भेट चंदीगडमध्ये झाली होती. दोघेही चंदीगड थिएटर ग्रूपमध्ये काम करायचे. यादरम्यान दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. एका मुलाखतीत किरण यांनी सांगितले होते की, असे काहीही नव्हते जे अनुपमला माझ्याबद्दल ठाऊक नव्हते. त्याच्याबद्दलही मला सगळे काही माहित होते. पण तेव्हा आमच्यात केवळ मैत्री होती. त्यापलीकडे काहीही नव्हते.

१९७९ मध्ये अनुपम यांनी कुटुंबाच्या आग्रहावरून मधुमालती नामक मुलीसोबत लग्न केले. पण ते दोघेही आपल्या नात्यात आनंदी नव्हते. याचदरम्यान नादिरा बब्बर यांच्या एका नाटकासाठी किरण व अनुपम दोघेही कोलकात्यात गेले. येथे त्यांची अनेक वर्षांनी पुन्हा भेट झाले. नाटक संपल्यावर अनुपम यांनी किरण यांना प्रपोज केले. आधी तर अनुपम विनोद करताहेत, असे किरण यांना वाटले. पण नंतर आपल्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे, हे त्यांना कळून चुकले. पुढे दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्यातील प्रेम वाढत गेले.  यानंतर आपल्या पहिल्या लग्नापासून विभक्त होते दोघांनी १९८५ मध्ये लग्न केले. अनुपम यांनी किरण यांचा मुलगा सिकंदर यांना स्वीकारत त्याला आपले नावही दिले.

टॅग्स :किरण खेरअनुपम खेर