Join us  

Birthday Special : त्या निर्णयामुळे माहेरच्यांपासून दुरावल्या होत्या आशा भोसले; पाहा unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 11:00 AM

सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचा आज वाढदिवस

ठळक मुद्देगणपतराव आणि आशा ताई यांना तीन मुले झाली.

सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचा आज वाढदिवस. आपल्या जादुई आवाजाने श्रोत्याच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या आशा दी यांनी हजारो गाण्यांना आवाज दिला. हिंदी, मराठीसह वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी 16 हजारांवर गाणी गायली.   

(लता दी-आशा दी )

 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला.   वयाच्या 10 वर्षी त्यांनी गायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजतागायत आपल्या जादुई आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.आज आम्ही आशा दी यांच्या खासगी आयुष्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. आशा दींच्या आवाजात जितका गोडवा आहे, तितकेच त्यांचे खासगी आयुष्य अनेक कटू गोष्टींनी भरलेले आहे.

आशा भोसले यांची मोठी बहीण म्हणजेच लता दींदी त्याकाळी यशाच्या शिखरावर होत्या. त्यांचे काम पाहण्यासाठी गणपतराव भोसले यांना त्यांनी पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवले. आशा दीदी याच गणपतराव भोसलेंच्या प्रेमात पडल्या आणि वयाच्या 16 व्या वर्षीच आशा दीदींनी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले.  गणपतराव 31 वर्षांचे होते. तर आशा दीदी जेमतेम 16 वर्षांच्या. त्यामुळे या लग्नाला मंगेशकर कुटुंबाकडून कडाडून विरोध झाला. लतादीदींनाही हे लग्न मान्य नव्हते. या विरोधाला झुगारून आशा दीदींनी लग्न केले. त्याक्षणापासून लता दीदी व आशा दीदी या दोन्ही बहीणींत दुरावा आला.  आशा दीदींनी  माहेरच्यांशी सर्व संबंध तोडले आणि आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.

गणपतराव भोसले आपल्या बहीणीसाठी योग्य नाहीत, असे लता दीदींना वाटे. शेवटी झालेही तसेच. आशाताई आणि गणपतरावांना तीन मुले झालीत. मात्र त्यांच्यामध्ये मतभेदांना सुरुवात झाली आणि अखेर हे नातं एक वाईट वळणावर येऊन संपले. गणपतराव भोसले आशा दीदींना मारहाण करत. माहेरच्यांना भेटू देत नसत. एकदिवस आशा भोसले यांना त्यांनी घरातून बाहेर काढले गेले. त्यावेळी आशा भोसले प्रेग्नंट होत्या. दोन मुले हेमंत व वर्षा आणि गर्भातल्या बाळाला घेऊन आशा भोसले घरातून बाहेर पडल्या. पण इतके होऊनही लतादीदी आणि आशाताईंमधील दुरावा संपला नव्हता.

गणपतरावांशी घटस्फोट केल्यानंतर आशा दीदींनी आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केले. आर. डी. बर्मन विवाहीत होते आणि  पहिली पत्नी रिता पटेल हीच्याशी त्यांचा घटस्फोट झाला होता.  आशा दींपेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या आर. डी. बर्मन यांनी आशाताईंना प्रपोज केले. पण सुरूवातीला आशा दीदींनी त्यांना नकार दिला. अखेर ब-याच काळानंतर आशाताई या नात्यासाठी तयार झाल्या. 1980 मध्ये या दोघांनी लग्न केले.  शेवटपर्यंत दोघेही मनाने एकमेकांसोबत राहिले. याचदरम्यान बर्मन सुद्धा अकाली जग सोडून गेले आणि आशाताई पुन्हा एकट्या पडल्या. 

(आशा ताई -मुलगी वर्षा)

गणपतराव आणि आशा ताई यांना तीन मुले झाली. सर्वात मोठा मुलगा हेमंत पायलट होता. काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिल्याने संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. कर्करोगाने हेमंतचे निधन झाली. मुलगी वर्षा स्तंभलेखिका होती. वर्षाने 2012 मध्ये वयाच्या 56 व्या वर्षी आत्महत्या केली. सध्या आशा भोसले सर्वात लहान मुलगा आनंदसोबत राहतात. आनंद आशा ताईचा बिझनेस सांभाळतो. तसेच तो स्वत:ही संगीतकार आहे.

टॅग्स :आशा भोसले