Join us  

आपल्या गर्लफ्रेंडसोबत अरबाज खानने सेलिब्रेट केला बर्थडे, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 2:38 PM

मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान आपल्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबाज त्याच्या जियोर्जिया एंड्रियानीसोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे.

ठळक मुद्दे अरबाजनी आपला बर्थ जियोर्जिया आणि आपल्या काही खास मित्रांसोबत सेलिब्रेट केलाजियोर्जियाने अरबाजसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर केले आहेत.

मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान आपल्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबाज त्याच्या जियोर्जिया एंड्रियानीसोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे.  जियोर्जिया आणि अरबाज आपल्या रिलेशनशीपला घेऊन खूपच सीरियस दिसतायेत. दोघांनी नेहमीच पार्टीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहण्यात आले आहे. 4 ऑगस्टला अरबाज खानने आपला 51वा बर्थ डे साजरा केला. अरबाजनी आपला बर्थ जियोर्जिया आणि आपल्या काही खास मित्रांसोबत सेलिब्रेट केला. बर्थडेच्या दिवशी जियोर्जियाने आपलं नातं पहिल्यांदाच जगासमोर स्वीकारले आहे.  जियोर्जियाने अरबाजसोबतचे काही खास फोटो शेअर करत त्याला सोशल मीडियावर विश केले आहे. पोस्ट केलेल्या फोटोसोबत तिने हार्टवाली इमोजीसुद्धा लावली आहे. या फोटोला चांगलीत पसंती सुद्धा मिळतेय.  घटस्फोट झाल्यानंतरसुद्धा अरबाजच्या सेलिब्रेशनमध्ये मलायका आपल्या मुलांसोबत सामिल झाली होती. अमृता अरोराने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. 

 

 

 

अरबाज खान सध्या त्याच्या आगामी ‘दबंग-३’च्या तयारीला लागला आहे. भारतनंतर सलमान दबंगचे शूटिंग करणार आहे. आतापर्यंत आलेले दबंगच्या सिरीज हिट झाल्या आहेत. सलमानच्या अपोझिट कोण झळकणार हे अद्याप कळलेले नाही. मात्र सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट झाल्याचे कळतेय. या सिनेमाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. याआधी दबंगचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते. 'दबंग 2' चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. याचित्रपटातही चुलबुल पांडेची स्टोरी असणार आहे. 

टॅग्स :अरबाज खानमलायका अरोरा