Join us

बिपाशा बासूला तिचा ‘हा’ फोटो वाटतो आॅल टाइम फेव्हरेट, तुम्हीही पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 13:49 IST

आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी बिपाशा बासूचा हा फोटो तिला भलताच आवडतो. तिने जेव्हा हा फोटो शेअर केला तेव्हा तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज भावला आहे.

बॉलिवूडची ब्लॅक ब्यूटी बिपाशा बासू सध्या सोशल मीडियावर भलतीच अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच बिपाशाने तिच्या एका जुन्या फोटोशूटमधील एक फोटो तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये बिपाशाने पांढºया रंगाच्या चादरीने स्वत:ला झाकत चादर ओठाखाली दाबलेली आहे. फोटोमध्ये बिपाशा खरोखरच खूप सुंदर दिसत आहे. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट असलेल्या या फोटोत बिपाशाने केस मोकळे सोडलेले असून, टपोºया डोळ्यांनी ती पोझ देताना दिसून येत आहे. फोटो कॅप्शन देताना बिपाशाने लिहिले की, ‘माझा हा आॅल टाइम फेव्हरेट फोटो, माझ्या फेव्हरेट फोटोग्राफर्सनी काढलेला हा फोटो, एवढ्या कमी वयात मला एवढे प्रेम आणि मदत करण्यासाठी, थॅक्यू माय डियरेस्ट फ्रेंड!’दरम्यान, बिपाशाला हा फोटो जेवढा फेव्हरेट वाटतो, तेवढाच तिच्या चाहत्यांना तिचा हा फोटो आवडत आहे. बिपाशाचे चाहते तिला तिच्या बोल्डनेससाठी पसंत करतात. या फोटोमध्ये तिच्या बोल्डनेसबरोबरच तिचे सौंदर्यही दिसून येत आहे. त्यामुळे चाहत्यांना तिचा हा फोटो अ‍ॅट्रॅक्ट करीत आहे. याव्यतिरिक्त बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आणखी एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती पॅरेट रंगाच्या टॉप आणि फेडेड जीन्समध्ये बघावयास मिळत आहे. फोटोत ती तिच्या क्लोज मैत्रिणीबरोबर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये बिपाशाने लिहिले की, ‘सीरियस ब्लास्ट फ्रॉम द पास्ट’दरम्यान, बिपाशाने तिच्या बॉलिवूड करिअरची सुुरुवात २००१ मध्ये आलेल्या ‘अजनबी’ या चित्रपटातून केली. चित्रपटात ती अक्षयकुमार, बॉबी देओल आणि करिना कपूर या स्टार्ससोबत बघावयास मिळाली. अब्बास-मस्तानच्या या चित्रपटानंतर बिपाशाने ‘राज, मेरे यार की शादी है, जिस्म, गुनाह, फुटपाथ, जमीन आणि नो एंट्री’ यांसारख्या चित्रपटांमधून नाव कमाविले. बिपाशा तिच्या चित्रपटांबरोबरच रिलेशनशिपमुळेही चांगलीच चर्चेत राहिली आहे. डिनो मोरिया, जॉन अब्राहम, हरमन बावेजा आणि राणा दग्गुबाती या अभिनेत्यांबरोबर तिचे नाव जोडले गेले आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये जॉन अब्राहमचे नाव बिपाशासोबत बराच काळ राहिले. बिपाशा आणि जॉन लग्न करणार, अशाही चर्चा मधल्या काळात रंगल्या होत्या. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. पुढे ३० एप्रिल २०१६ रोजी बिपाशाने अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्याशी लग्न केले. सध्या हे दोघे वैवाहिक जीवनाचा आनंद घेत असून, त्यांच्या आयुष्यात खूश आहेत. ​