Join us  

संजय दत्तवरील बायोपिकचे टायटल अखेर निश्चित; ‘या’ नावावर केला शिक्कामोर्तब!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 9:03 AM

राजकुमार हिरानी यांनी जेव्हा अभिनेता संजय दत्त याच्यावर बायोपिक बनविण्याची घोषणा केली तेव्हापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. ...

राजकुमार हिरानी यांनी जेव्हा अभिनेता संजय दत्त याच्यावर बायोपिक बनविण्याची घोषणा केली तेव्हापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या अनुषंगाने नवी बातमी समोर येत असून, निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव फायनल केले आहे. होय, राजकुमार हिरानी यांनी संजूबाबाच्या बायोपिकचे नाव निश्चित करताना ‘संजू’ असे ठेवले आहे. हे नाव ठेवण्यामागचे कारण असे की, इंडस्ट्रीमध्ये त्याला त्याचे सर्व मित्र ‘संजू’ या नावाने ओळखतात. चित्रपटाच्या टायटलवरून सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात होत्या. सुरुवातीला असे म्हटले जात होते की, हा चित्रपट ‘दत्त’ या नावाने प्रदर्शित केला जाईल. पुढे ‘संजू बाबा’ या नावाची चर्चा समोर आली. मात्र हे सर्व अफवा असल्याचे आता सिद्ध झाले असून, ‘संजू’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजूबाबाची भूमिका साकारणार आहे. त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रिपोर्टनुसार, चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित केला जाईल. स्वत: राजकुमार हिरानी यांनीच ट्विट करून याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून, काहीकाळापूर्वीच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी रॅम अप पार्टीचे फोटो शेअर केले होते. फोटोमध्ये सोनम कपूर, रणबीर आणि राजकुमार हिरानी बघावयास मिळत आहेत.  दरम्यान, चित्रपटाच्या सेटवरून संजय दत्तच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरचे जेवढे फोटो समोर आले आहेत, त्या सर्व फोटोंमध्ये तो खूपच इम्प्रेसिंग दिसत आहे. कारण रणबीर संजूबाबाच्या लूकमध्ये हुबेहूब बघावयास मिळत असल्याने प्रेक्षक त्याला आतापासूनच संजूबाबा असे म्हणताना दिसत आहेत. हा चित्रपट यावर्षाच्या मोस्ट अवेटेड श्रेणीमध्ये असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता असेल यात शंका नाही.