Join us  

अरेच्चा, रानू मंडलवरही बनणार बायोपिक, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 4:01 PM

कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडलनं स्वप्नातही विचार केला नसेल.

कधी काळी रानाघाटच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागणारी रानू मंडल. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आली. ‘एक प्यार नगमा…..’ गात रातोरात प्रसिद्ध झाली होती. रानू मंडलला हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडलचं संपूर्ण आयुष्यच पालटलं होतं. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडलनं स्वप्नातही विचार केला नसेल. 

'एक प्यार का नगमा हे' गाणं गात रानू मंडल स्टार बनली,मात्र रानू मंडलला मिळालेले यश टिकवता आले नाही. भेटायला येणाऱ्या चाहत्यांसोबतही रानू  उद्धटपणे वागू लागील होती. रानू मंडलचे असे वागणे पाहून हिमेश रेशमियाने रानूला सगळ्यांची माफीही मागायला सांगितली. मात्र हिमेशचेही रानूने ऐकले नाही.

रानूमुळे हिमेशवरही टीका व्हायला सुरुवात झाली होती. मात्र यातून हिमेशने काढता पाय घेतला आणि रानूकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या कामात बिझी झाला. रानूच्या उद्धट वागण्यामुळेच पुन्हा तिच्यावर रस्त्यावरच गाणे गात भीक मागण्याची वेळ आली आहे.

आता रानूवर बायोपिक बनणार असल्याची चर्चा आहे. गेल्याच वर्षी सिनेमाची घोषणाही करण्यात आली होती. तसेच सिनेमात मुख्य भूमिका कोण साकारणार यासाठीही अभिनेत्रीचा शोध सुरु होता. सिनेमाची कथा राणूच्या जीवनावर आधारीत असून ‘मिस राणू मारिया’ असं  सिनेमाचे शिर्षक असणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऋषिकेश मंडल या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

रानूच्या भूमिकेत  अभिनेत्री इशिका डे झळकणार आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये सिनेमाचे शूटिंग होणार असल्याचे म्हटले जात आहे. इशिका या सिनेमासाठी दिग्दर्शकाची पहिली चॉइस नव्हती. तिच्याआधी सुदिपा चक्रवर्तीला कास्ट करण्यात आले होते. मात्र लॉकडाउनमुळे तारखांचं शेड्युल बिघडलं आणि सुदिपाच्या जागी इशिताला संधी देण्यात आली.

इशिकान 'सेक्रेड गेम्स', 'लाल कप्तान' सारख्या सिनेमात झळकली आहे.दरम्यान सिनेमाची टीम  हिमेश रेशमियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनतरी हिमेशकडून कोणत्याही प्रकारची माहीत समोर आलेली नाही.तुर्तास  रानू मंडलचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.   ​ 

टॅग्स :राणू मंडलहिमेश रेशमिया