Join us  

वरुण धवनने आपल्या रिलेशनशीपबाबत केला 'हा' मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 8:15 AM

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आपल्या चित्रपटांशिवाय रिलेशनशीपला घेऊन नेहमीच चर्चेत असतो. वरुण धवन आणि नताशा दलालच्या नात्याबाबत नेहमीच काही ...

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आपल्या चित्रपटांशिवाय रिलेशनशीपला घेऊन नेहमीच चर्चेत असतो. वरुण धवन आणि नताशा दलालच्या नात्याबाबत नेहमीच काही ना काही चर्चा होत असते. मात्र वरुण धवनने आपले नातं कधीच मीडियासमोर अधिकृतरित्या स्वीकारले नाही. पहिल्यांदाच वरुणने आपल्या  रिलेशनशिपवरुन पडद्या उचलत एक मोठा खुलासा केला आहे.  वरुणने दिलेल्या एका इंटरव्हु दरम्यान तो म्हणाला की, ''नताशाला एक सर्वसामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगायचे आहे. तिच्या आनंदासाठी मी माझ्या पसर्नल लाइफबाबत जास्त काही बोलत नाही.'' पुढे तो म्हणाला की, ''लोक जे त्याच्या आणि नताशाबाबत लिहितात त्या गोष्टी अफवा असतात.''  नताशा वरुणची खूप क्लोज फ्रेन्डदेखील आहे. बालपणापासून ते दोघे सोबत आहोत. दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत.मध्यंतरी वरुण धवनला रेमो डिसूझाच्या आगामी चित्रपटात अभिनय करण्यासाठी तब्बल 32 कोटींची ऑफर देण्यात आल्याचे समजते. यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ सुद्धा दिसणार असल्याची चर्चा आहे मात्र कॅटला फक्त 7 कोटींचीच ऑफर करण्यात आली आहे.    ALSO READ :  ​वरूण धवनला मनातल्या मनात छळतेयं ‘ही’ एकचं गोष्ट!!वरुण धवनचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'अक्टूबर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. यानंतर त्यांने अनुष्का शर्मासोबत सुई धागा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.या चित्रपटात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून 'मौजी' असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल.दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. यशरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून मनीष शर्मा सिनेमाचे निर्माते आहेत.यशराज बॅनरचा हा सिनेमा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.