Join us  

भूमिका चावलाने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी बदलले नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:30 PM

भूमिका चावलाने तेरे नाम या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले होते. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. हा चित्रपट आणि या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी अनेक कलाकार आपले नाव बदलतात. नाव बदलण्यामागे प्रत्येक कलाकाराचे वेगवेगळे कारण असते. तेरे नाम या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या भूमिका चावलाने देखील अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी तिचे नाव बदलले आहे. २००० मध्ये युवाकुडू या तेलगू चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात येण्याआधी तिने तिचे नाव बदलले असल्याने तिला भूमिका या नावानेच सगळे ओळखतात. 

भूमिका चावलाने तेरे नाम या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले होते. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. हा चित्रपट आणि या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तिने तेरे नाम या चित्रपटाआधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. भूमिका चावला गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने गेल्या वर्षी धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात ती धोनीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. तेरे नाम या चित्रपटामुळे भूमिकाला प्रेक्षकांनी भूमिका चावलाला डोक्यावर घेतले. पण त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नाही. तिने त्यानंतर रन, दिल ने जिसे अपना कहा, सिलसिले, फॅमिली अशा काही चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिला यश मिळाले नाही. सध्या ती बॉलिवूडमध्ये दूर असून तिचा सगळा वेळ कुटुंबियांना देत आहे. तुम्हाला माहीत आहे का, भूमिका चावलाचे खरे नाव भूमिका नसून रचना आहे. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिचे नाव बदलले. भूमिकाचा जन्म २१ ऑगस्ट १९७८ला दिल्लीमध्ये झाला. तिचे वडील लष्करात होते तर तिची आई शिक्षिका होती. भूमिकाने २००७ मध्ये लग्न केले. तिचे पती हे भरत ठाकूर असून ते एक योगा टीचर आहेत. तिचे आणि भरत यांची ओळख योगा शिकत असताना झाली होती. पहिल्याच भेटीत त्या दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. त्या दोघांनी २१ ऑक्टोबर २००७ मध्ये नाशिक येथील देवळाली येथे लग्न केले.