‘बाहुबली’चा भल्लाळदेव अर्थात राणा दग्गुबतीचा आज बर्थ डे, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST
‘बाहुबली द बिगनींग’ आणि ‘बाहुबली2’मधील भल्लाळदेव कुणाला ठाऊक नाही. भल्लाळदेवाची भूमिका अजरामर करणारा हा अभिनेता म्हणजे, राणा दग्गुबत्ती. आज (१४ डिसेंबर ) राणाचा बर्थडे.
‘बाहुबली’चा भल्लाळदेव अर्थात राणा दग्गुबतीचा आज बर्थ डे, पाहा फोटो!
‘बाहुबली द बिगनींग’ आणि ‘बाहुबली2’मधील भल्लाळदेव कुणाला ठाऊक नाही. भल्लाळदेवाची भूमिका अजरामर करणारा हा अभिनेता म्हणजे, राणा दग्गुबत्ती. आज (१४ डिसेंबर ) राणाचा बर्थडे. तेलगू चित्रपटांतून करिअर सुरू करणा-या राणाने बॉलिवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षय कुमारसोबत ‘बेबी’मध्ये तो दिसा होता. राणा दग्गुबत्तीचे वडिल सुरेश बाबू मोठे निर्मार्ते आहेत. त्याचे आजोबा डी. रामानायडू हेही निर्माते राहून चुकले आहेत. व्हिज्युअल इफेक्ट्स कोआॅर्डिनेटर म्हणून राणाने आपल्या करिअरची सुरवात केली होती. राणा फक्त एकाच डोळ्याने बघू शकतो. एका वृत्तानुसार राणा डाव्या डोळ्याने बघू शकत नाही. लहानपणी राणाला डावा डोळा कोणीतरी डोनेट केला होता. मात्र त्याने तो कधीच बघू शकला नाही. ‘बाहुबली2’साठी राणाने २८ किलो वजन वाढवले होते.