Join us  

'झिरो' चित्रपटाच्या ट्रेलरला मिळतोय उत्तम प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 6:22 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

ठळक मुद्दे 'झिरो' चित्रपटाचा ट्रेलरला प्रेक्षकांची मिळतेय पसंती

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या ४ दिवसांत १० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्ह्यूजमुळे 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान', 'रेस ३' आणि 'बाहुबली २' यांसारख्या चित्रपटांच्या ट्रेलरचे रेकॉर्ड तोडले आहेत. 'झिरो'च्या ट्रेलरला २४ तासांत ५.४ कोटी व्ह्यूज मिळाले होते. 

शाहरुख खानच्या वाढदिवसा दिवशी 'झिरो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'झिरो' मधला स्वत:चा पहिला लूक शाहरुखने काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित केला होता. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळा असणार अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. शारीरिक व्यंगाकडे दुर्लक्ष करत आयुष्य एका वेगळ्या प्रकारे जगायला शिकवणारा हा चित्रपट असणार आहे. यात शाहरुख एका बुटक्या व्यक्तींची भूमिका साकारत आहे. वयाची ३० ओलांडली तरी बउआचे लग्न होत नाही अखेर त्याला मनासारखी जोडीदार अनुष्काच्या रुपाने मिळते. पण नियतीला ते मंजूर नसते आणि अशाताच या बउआची भेट सुपरस्टारशी म्हणजेच कतरिनाशी होते आणि त्याचे आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचते, या कथानकावर आधारित हा चित्रपट असणार आहे.'झिरो' या चित्रपटाकडून शाहरुखला मोठ्या अपेक्षा आहेत. अलीकडच्या काळात शाहरूखच्या चित्रपटांना फार यश मिळवता आले नाही. झिरोद्वारे यशस्वी कमबॅक करण्याचा शाहरुखचा इरादा आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :शाहरुख खानझिरो सिनेमा