Join us

​प्रियांकासाठी बदलण्यात आली ‘बेवॉच’ची स्क्रीप्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 11:24 IST

देसी गर्ल प्रियांका चोप्राचे ‘क्वांटिको’मुळे हॉलीवूडमध्ये प्रस्थ जरा जास्तच वाढलेले दिसतेय. आगामी चित्रपट ‘बेवॉच’मध्ये ती खलनायिकेच्या भूमिकेत आहे हे ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राचे ‘क्वांटिको’मुळे हॉलीवूडमध्ये प्रस्थ जरा जास्तच वाढलेले दिसतेय. आगामी चित्रपट ‘बेवॉच’मध्ये ती खलनायिकेच्या भूमिकेत आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. परंतु पूर्वी हे पात्र एका पुरुष अभिनेत्याचे होते.प्रियांकाने दिग्दर्शक सेठ गॉर्डोनला विनंती करून करून स्क्रीप्टमध्ये बदल करायला लावले आणि मग ‘व्हिक्टर’ नावाच्या पात्राचे पुनर्लेखन करून ते ‘पीसी’साठी ‘व्हिक्टोरिया’ करण्यात आले. आता प्रियांकाच्या मागणीला हॉलीवूडमध्ये एवढा मान दिला जातोय म्हटल्यावर तिच्या स्टार पॉवरचा अंदाज येतो.अमेरिकेत विविध पुरस्कारांवर मोहर उमटवल्यानंतर ती आतापर्यंत १५पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मॅगझीन्सच्या कव्हरवर झळकलेली आहे. तिला जेव्हा बॉण्ड सिनेमाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली होती की, त्याचे नाव जेम्सऐवजी ‘जेन’ केले तर आनंदाने तो चित्रपट करेन. आम्हाला विश्वास आहे की,‘ बेवॉच’नंतर तिची ही डिमांडदेखील पूर्ण होऊ शकते.