Join us

‘बेबो’च्या निर्णयाचा बसला होता धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 10:05 IST

 काही वर्षांपूर्वी करिना कपूरने निर्णय घेतला की, तिला नवाब पतौडी सैफ अली खान याच्यासोबत लग्न करायचे आहे. बेबोच्या घरात ...

 काही वर्षांपूर्वी करिना कपूरने निर्णय घेतला की, तिला नवाब पतौडी सैफ अली खान याच्यासोबत लग्न करायचे आहे. बेबोच्या घरात कळाल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. खासकरून तिची मोठी बहीण करिश्मा कपूर आणि आई यांना प्रचंड धक्का बसला. एक लग्न झालेल्या आणि मुले असणाºया व्यक्तीशी बेबो लग्न  करणार ? यावर कुणाला विश्वासच बसत नव्हता.वेल, पण ती बेबो आहे. करिश्मा म्हणते,‘ बेबोचा प्रत्येक निर्णय फार चांगला असतो. तिचे स्वत:चे आणि कुटुंबियांचे हित कशात आहे याचा ती नेहमी विचार करत असते. कुठलाही निर्णय ती भावनेच्या भरात घेत नाही. तिच्या निर्णयाचे घरात कौतुकच केले जाते.न डगमगता स्वत:साठी आणि कुटुंबियांसाठी उभे राहण्याची ताकद तिच्यात आहे. आणि आता तर तिच्याकडे गुड न्यूज देखील आहे.’ करिना आता लवकरच ‘वीरें दी वेडींग’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर बेबोसाठी चांगले वातावरण तयार करून देण्याचे प्रॉमिस टीमने केले आहे.