Join us

‘सदमा’च्या रिमेकमध्ये बेबो अन् रणवीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 21:31 IST

श्रीदेवी आणि कमल हसन यांचा ‘सदमा’ हा चित्रपट खरंच उत्तम अभिनयाचे सादरीकरण करणारा ठरला. त्या काळचा भावनाविवश करणारा तो ...

श्रीदेवी आणि कमल हसन यांचा ‘सदमा’ हा चित्रपट खरंच उत्तम अभिनयाचे सादरीकरण करणारा ठरला. त्या काळचा भावनाविवश करणारा तो चित्रपट होता. श्रीदेवी आणि हसन यांचा अविस्मरणीय परफॉर्मन्स या चित्रपटातून पहावयास मिळाला. श्रीदेवी ज्या महिलेची भूमिका करते ती एका गंभीर दुखापतीला सामोरी गेलेली असते. तिला कमल हसनची भूमिका करणारा व्यक्ती सांभाळतो. त्यांची भावनाविवश करणारी रोमँटिक लव्ह स्टोरी सदमा मधून मांडली आहे. पण, आजची तरूण पिढी या ‘सदमा’ पासून खुप दूर आहे. आता निर्माता बोनी कपूर ‘सदमा’ चा रिमेक बनवणार आहेत. आणि प्रथमच स्क्रिनवर करिना कपूर आणि रणवीर सिंग यांना घेणार आहेत. करिना श्रीदेवीची भूमिका पुन्हा रंगवणार आहे तर कमल हसनची भूमिका रणवीर साकारणार आहे. करिना तर अनुभवी कलाकार आहे पण रणवीर सिंगच कमल हसन सारख्या प्रगल्भ व्यक्तीची भूमिका करू शकेल का हेच त्याच्यासमोरील खरे आव्हान आहे.