बाहुबली प्रभास अन् देवसेना अनुष्का शेट्टीचा ‘या’ दिवशी होणार साखरपुडा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 21:32 IST
‘बाहुबली’च्या अफाट यशानंतर चित्रपटातील लीड जोडी प्रभास आणि अनुष्का शेट्टी लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. ...
बाहुबली प्रभास अन् देवसेना अनुष्का शेट्टीचा ‘या’ दिवशी होणार साखरपुडा !
‘बाहुबली’च्या अफाट यशानंतर चित्रपटातील लीड जोडी प्रभास आणि अनुष्का शेट्टी लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. अशात ही जोडी साखरपुडा केव्हा उरकणार याबाबतची एक खात्रीशीर बातमी आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. होय, प्रभास आणि अनुष्का याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात साखरपुडा उरकणार आहेत. सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’मध्ये व्यस्त आहे तर अनुष्का तिच्या तेलगूमधील प्रोजेक्टवर काम करीत आहे. अशात हे दोघेही व्यस्त असताना साखरपुड्याचा मुहूर्त डिसेंबर महिन्यात काढण्यात आला आहे. तारीख जरी निश्चित समजली नसली तरी डिसेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात या दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ‘बाहुबली’ चित्रपटात अनुष्का आणि प्रभास या दोघांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. अशात या दोघांनी आयुष्यभर एकत्र राहावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. शिवाय ‘बाहुबली’च्या रिलीजनंतर दोघांमधील अफेअरच्या चर्चाही जोरदार रंगल्या होत्या. मात्र दोघांनीही या चर्चांना अधिकृत दुजोरा दिला नव्हता. जेव्हा जेव्हा त्यांच्यातील लिंकअपच्या चर्चा व्हायच्या तेव्हा तेव्हा आम्ही चांगले मित्र असल्याचे या दोघांकडून सांगितले जात होते. मात्र, आता पुन्हा एकदा दोघे थेट लग्नाच्या विषयावरून चर्चेत आले आहेत. वास्तविक प्रभास त्याचे व्यक्तिगत जीवन कधीच पब्लिकली व्यक्त करू इच्छित नाही. प्रभासच्या मते, ‘मी माझ्या व्यक्तिगत आयुष्याविषयी बोलू इच्छित नाही. बरेचसे लोक मला माझ्या अफेअर आणि लग्नाविषयी विचारतात. परंतु मला त्यांना यावर उत्तर देण्यात काहीच स्वारस्य वाटत नाही. वास्तविक लोकांनीच असे प्रश्न विचारताना विचार करायला हवा. मला माझे खासगी जीवन जाहीर करायचे नाही. मात्र मी जेव्हा लग्न करणार तेव्हा नक्कीच त्या सर्वांना सांगणार.’ प्रभासचे जसे विचार आहेत, अगदी तसेच काहीसे अनुष्काचेही आहेत. त्यामुळेच कदाचित या दोघांकडूनही अद्यापपर्यंत त्यांच्या साखरपुड्याविषयी दुजोरा दिला गेला नसावा. ‘बाहुबली-२’मध्ये देवसेना बनून अनुष्का शेट्टीने बाहुबली प्रभासवर चांगलीच मोहिनी घातली होती. दोघांची जोडी हिट ठरल्याने चाहत्यांनाही या दोघांनी एकत्र यावे असेच वाटत होते. आता चाहत्यांची इच्छा काहीशी पूर्ण होताना दिसत आहे. आता यास अधिकृत दुजोरा मिळावा, अशीच दोघांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.