Join us  

​बाहुबली फेम अनुष्का शेट्टी या क्रिकेटरच्या पडली होती प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 9:23 AM

बाहुबली २ः कन्क्ल्युजन या चित्रपटातील देवसेना या भूमिकेमुळे अनुष्का शेट्टीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अनुष्का ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री असून ...

बाहुबली २ः कन्क्ल्युजन या चित्रपटातील देवसेना या भूमिकेमुळे अनुष्का शेट्टीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अनुष्का ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने अनेक दक्षिणेच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे दक्षिणेत तिचे अनेक फॅन्स आहेत. पण बाहुबलीच्या यशानंतर केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर जगभरातील लोक तिला ओळखू लागले आहेत. तिच्या फॅन्सची संख्या सध्या प्रचंड वाढली आहे. बाहुबली या चित्रपटानंतर आता तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. तिच्या सोंदर्यावर अनेक जण फिदा झाले आहेत. तिच्यासोबत लग्न करण्याची आज अनेकांची इच्छा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का अनुष्का शर्माला गेल्या अनेक वर्षांपासून एक क्रिकेटर प्रचंड आवडतो. तो तिचे पहिले प्रेम असल्याचे तिने नुकतेच मान्य केले आहे.बाहुबली या चित्रपटानंतर प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. ते दोघे लवकरच लग्न देखील करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण अनुष्काचे मन प्रभासवर नव्हे तर एका दुसऱ्याच क्रिकेटरवर जडले आहे. एका क्रिकेटरच्या ती अनेक वर्षांपासून प्रेमात असल्याचे तिने स्वतः कबूल केले आहे. तसेच हा क्रिकेटर तिचे पहिले प्रेम असल्याचे तिने सगळ्यांना सांगितले आहे. एका तामीळ वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिचे पहिले प्रेम कोण होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. तिचे पहिले प्रेम हे राहुल द्रविड असल्याचे तिने सांगितले आहे. आपल्या या पहिल्या प्रेमाविषयी अनुष्का सांगते, मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो. राहुल तर माझा आवडता क्रिकेटर आहे. मी लहान असल्यापासूनच मला तो खूप आवडतो. माझे त्याच्यावर क्रश होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. एक वेळ तरी अशी आली होती की, मी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडले होते. अनुष्काने २००५ साली तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आजवर तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिला आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. Also Read : लहानपणी अशी दिसायची 'बाहुबली'ची ही 'देवसेना',फोटो सोशल मीडियावर केला शेअर